प्रकल्पग्रस्तांना द्या मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 08:34 PM2020-09-26T20:34:48+5:302020-09-26T20:35:11+5:30
अक्कलपाड्याचा प्रश्न : शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील खंडलाय, बांबुर्ले, भदाणे येथील अक्कलपाडा पाटचारी प्रकल्प शेतकऱ्यांना मोबदला ताबडतोब द्या, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केली आहे़ या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देखील देण्यात आले़
अक्कलपाडा डाव्या कालव्यातील नेर, खंडलाय खुर्द, खंडलाय बांबुर्ले, भदाणे येथील पाटचारी प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत़ अनेक वर्षापासून ते मोबदल्यासाठी प्रशासनाकडे आपली कैफियत मांडत आहेत़ मात्र, त्यांच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही़ लक्ष वेधण्यासाठी एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले होते़ त्या उपोषणाची दखल घेत भूसंपादनाच्या उपजिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा निवाडा लवकर करण्यात येईल असे पत्र १० जून २०१९ ला दिले होते़ गेल्या वर्षभरापासून त्यावर कारवाई झालेली दिसत नाही़ कित्येक वर्षापासून प्रकल्पग्रस्त हेलपाटे मारत आहेत़ भूसंपादन विभागाचे झालेले दुर्लक्ष शेतकºयांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्यास कारणीभूत असल्याचा आरोप आहे़ प्रशासनाने तात्काळ मोबदला द्यायला हवा़