दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्यावरील घटना

By देवेंद्र पाठक | Published: October 7, 2023 04:16 PM2023-10-07T16:16:49+5:302023-10-07T16:16:57+5:30

धुळे : भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची पायी चालणाऱ्या इसमाला धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने उपचार घेत असताना प्रकाश ...

Pedestrian killed in bike collision; Incident at Sule Phata in Shirpur Taluka | दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्यावरील घटना

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्यावरील घटना

googlenewsNext

धुळे : भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची पायी चालणाऱ्या इसमाला धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने उपचार घेत असताना प्रकाश शिलदार पावरा यांचा मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील सुळे फाटा भागात १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी पावणे बारा वाजता अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रमेश कैलास पावरा यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रमेश यांचा चुलत भाऊ प्रकाश शिलदार पावरा (सोलंकी) आणि त्यांचा मुलगा सोना प्रकाश पावरा हे दोघेजण शिरपूर तालुक्यातील सुळे फाट्याजवळून दहिवद गावाकडे पायी चालले होते. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एमपी ४६ एमव्ही ८९४२ क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगात आली आणि प्रकाश पावरा यांना धडकली. दुचाकीचा वेग हा अधिक असल्याने प्रकाश पावरा हे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी मार लागला.

अपघाताला जबाबदार असणाऱ्या दुचाकी चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत प्रकाश पावरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी रात्री फरार दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक शेखर बागुल घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed in bike collision; Incident at Sule Phata in Shirpur Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.