१० पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:39 PM2018-08-27T22:39:41+5:302018-08-27T22:41:59+5:30

मोहीम पुन्हा होतेय सक्रीय : तंबाखूसह गुटखा विक्रीवर प्रतिबंध

Penal action on 10 pages holders | १० पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई

१० पानटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई

Next
ठळक मुद्देराज्य तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम धुळ्यात होतेय अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात गुटखा विक्री करणाºयांवर सध्या प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे़ सोमवारी विविध १० ठिकाणी कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे़ 
अन्न आणि औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेत डॉ़ स्वप्निल देवरे, डॉ़ प्रशांत तिडके, डॉ़ पाटील, डॉ़ कासार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे मनोज पाटील, चेतन कंखरे यांचा समावेश होता़ या पथकाने शहरातील उन्नती माध्यमिक विद्यालय, परिवर्तन विद्यालयासह चितोड रोड परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या १० पानटपरीवर जावून कारवाई करण्यात आली़ या पानटपरीतून छूप्या पध्दतीने गुटख्याची विक्री पकडण्यात आली़ नियमानुसार त्या प्रत्येक पानटपरीवर २०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली़ दरम्यान, ही मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ 

Web Title: Penal action on 10 pages holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.