धुळे शहरात वीज चोरी करणाºयांवर २३ लाखांची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:03 PM2018-05-12T12:03:32+5:302018-05-12T12:03:32+5:30
सव्वा महिन्यात १६० जणांकडे वीजचोरी पकडली, आठ लाख दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वीज मीटरमध्ये हेराफेरी करून वीज चोरी करणाºयांविरूद्ध महावितरण कंपनीचे धडक मोहीम सुरू केली आहे. सव्वा महिन्यात १६० वीज चोºया पकडण्यात आल्या असून आतापर्यंत २३ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी पाच लाख वसूल करण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता के.डी.पावरा यांनी दिली.
शहरासह ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक ठिकाणी घरगुती वीज मीटरमध्येच हेराफेरी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वापर जरी जास्त असला तरी काहींना बिले अगदीच नगण्य येत होती.
या वीज चोरांविरूद्ध महावितरण कंपनीने धडक मोहीम सुरू केलेली आहे.धुळे शहर विभाग कार्यालयांतर्गत असलेल्या चार उपविभागीय कार्यालयामार्फत घरगुती, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रातील वीज मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात शहरात व ग्रामीण भागात एप्रिल २०१८ मध्ये १३० वीज चोºया उघडकीस आल्या. त्यांच्यावर १८ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, आठ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे. तर मे महिन्याच्या दहा तारखेपर्यंत ३० वीज चोºया पकडण्यात आल्या असून, त्यांच्यावर पाच लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. ही रक्कम वसुलीसाठी संबंधितांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमुळे वीज चोरी करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
मोहीम राबवून वीज चोरी पकडण्यात आली आहे. वीज चोरी करणाºयांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली असून, गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.
के.डी. पावरा,
कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी,धुळे