लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:35 PM2020-05-21T20:35:51+5:302020-05-21T20:36:12+5:30

नियमांची पायमल्ली : अत्यावश्यक सेवा नसतानाही सुरु ठेवले दुकान, कारवाईचा बडगा

Penalties for professionals who break lockdown rules | लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांना दंड

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाउनचा काळ सुरु आहे़ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना काही अटींवर सूट देण्यात आली आहे़ त्यात फिजिकल डिस्टन्सिंग हा महत्वाचा मुद्दा आहे़ असे असताना देखील सहाव्या गल्लीमध्ये पतंजलीची उत्पादने विक्री करणाºया दुकानात लॉकडाउन आणि फिजिकल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन होत नसल्याने महापालिकेच्या पथकाने दोन हजाराचा दंड ठोठावला असल्याची माहिती पथक प्रमुख प्रसाद जाधव यांनी दिली़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार पाठोपाठ जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे़ अत्यावश्यक सेवा कोणत्या, त्यांनाही किती वेळ सेवा देता येऊ शकते यासाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे़ नियमाच्या बाहेर कोणीही जाता कामा नये यासाठी वेळोवेळी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत़ त्यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अशा किमान बाबींचा समावेश आहे़
असे असताना देखील दुकानांमध्ये होणारी गर्दी, त्यात पुन्हा फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे अशा काही बाबी प्रकर्षाने समोर आलेल्या आहेत़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना महापालिका आयुक्तांकडून पारीत झाली आहे़ सुचनेनुसार पथकाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे़ त्यात दुकानांमध्ये होणारी गर्दी, त्यात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे या बाबी गांभिर्याने घेतल्या जात आहेत़ जे कोणी यात दोषी आढळत आहेत, त्यांना जागेवरच दोन हजाराचा दंड ठोठावला जात आहेत़ परिणामी या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे़ फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून व्यवहार करावेत, मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे़
लॉकडाउनमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तुच्या व्यवसायांना परवानगी आहे़ त्यात किराणा दुकाने, धान्य दुकाने, भाजीपाला, दूध, औषधालये यांचा समावेश आहे़ परंतु शहरात इतरही व्यवसाय गेल्या आठवड्यापासुन परस्पर सुरु झाले आहेत़ साक्री रोडसह इतरही भागांमध्ये शितपेयाची दुकाने, रसवंती, हॉटेल्स सुरु असल्याचे निदर्शनाला आले आहे़ तसेच महापालिकेच्या पथकामार्फत केवळ बाजारपेठांमध्ये कारवाई होताना दितसे़ परंतु कॉलन्यांमध्ये आणि शहरातील गल्लीबोळात मात्र दुकाने सुरु असल्याची चर्चा आहे़ विशेष म्हणजे दुकाने सुरु ठेवण्याची मुदत केवळ दुपारी दोनपर्यंत असताना काही दुकाने दिवसभर सुरु असल्याच्याही तक्रारी आहेत़ लहान व्यावसायिक लॉकडाउनचे नियम पाळत नसल्याचे दिसत आहे़ त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
परंतु दोन महिन्यांपासुन व्यवसाय बंद असल्याने आधीच आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत़ आणखी किती दिवस दुकाने बंद ठेवणार असा प्रश्न त्यांना पडला आहे़
गजानन स्टोअर्सवरही कारवाई
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे़ तशा प्रकारची यादी यापुर्वीच प्रसारीत झालेली आहे़ तरी देखील काही ठिकाणी काही दुकाने बिनधास्तपणे सुरु ठेवून छुप्या पध्दतीने आपले दैनंदिन व्यवहार करत आहेत़ अशा प्रकारची तक्रार महापालिकेकडे आल्यानंतर पथकाने त्याची दखल घेतली़ प्रसाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या पथकाने सहावी गल्लीकडे आपला मोर्चा वळविला़ कोपºयावरच पतंजली वस्तू विक्रीच्या दुकानात कारवाई केल्यानंतर पथकाने गजानन स्टोअर्स या कटलरी दुकानाकडे आपला मोर्चा वळविला़ या दुकान अत्यावश्यक सेवेत येत नाही़ तरी देखील दुकान उघडे दिसल्याने त्यांनाही २ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे़ या कारवाईमुळे खळबळ उडाली़

Web Title: Penalties for professionals who break lockdown rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे