मास्क न लावल्याने केला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:22 PM2020-04-19T22:22:22+5:302020-04-19T22:22:52+5:30

महापालिका : शहरात धडक केली कारवाई

Penalty for not wearing a mask | मास्क न लावल्याने केला दंड

मास्क न लावल्याने केला दंड

googlenewsNext

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर केलेले आहे़ अत्यावश्यक सेवेसाठी जाताना मास्कचा वापर करावा असे आदेशित केलेले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ९ जणांना प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आलेला आहे़ ही कारवाई महापालिकेच्या पथकाने केली आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आलेला आहे़ आता त्याची ३ मे पर्यंत मुदत देखील वाढविण्यात आलेली आहे़ शहरात तीन प्रभागात पायलट प्रोजेक्ट म्हणून शंभर टक्के लॉकडाउन करण्यात आले़
कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, विनाकारण रस्त्यावर फिरु नये, अत्यावश्यक असल्यास तोंडाला मास्क लावावे अशा काही सूचना प्रशासनाकडून पारीत झालेल्या आहेत़ त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी उलट दुर्लक्ष करुन विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या शहरात वाढताना दिसत आहे़ त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने पथकाची नियुक्ती केली आहे़
या पथकाने ठिकठिकाणी फिरुन मास्क न लावणाºयांचा शोध घेतला असता त्यात ९ जणं सापडली़ त्यांना प्रत्येकी २०० रुपये तर त्यातीलच दोघांना १०० रुपये दंड ठोठावण्यात आला़
यात जे़ के़ डिसुजा, रामकृष्ण पवार, हेमंत महाजन, विक्रांत भामरे, तुषार विसपुते, लोकेश धामणे, दिपाली मोनानी यांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला़ तर शांताराम खैरनार यांना १०० रुपये तर उपद्रव केल्याबद्दल साई चांदुराम किराणा यांना १०० रुपये दंड ठोठावण्यात आला़
सोशल डिस्टन्सिंग पालन न करणाºया तीन दुकानदारांना प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आलेला आहे़ त्यात प्रामुख्याने राहुल चिकन सेंटर, जावीद खाटीक, अशपाक मटनवाले या तिघांचा समावेश आहे़ यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग पालन झाले नसल्याची बाब तपासणीतून समोर आली़

Web Title: Penalty for not wearing a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे