धुळ्यात ४ हजार शौचालयांची कामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:29 PM2018-03-27T15:29:04+5:302018-03-27T15:29:04+5:30

स्वच्छ भारत मिशन : साक्री, शिरपूर तालुक्यात १०० टक्के कामे पूर्ण; पाच दिवसात कामे पूर्ण करण्याचे आव्हान

Pending work of 4 thousand toilets in Dhule | धुळ्यात ४ हजार शौचालयांची कामे प्रलंबित

धुळ्यात ४ हजार शौचालयांची कामे प्रलंबित

Next
ठळक मुद्देवैयक्तीय शौचालयांचे उद्दिष्टपूर्ण करण्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन व जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.चे पदाधिकारी, अधिकारी, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे कर्मचारी यांनी धुळे जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासात्यापार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जनजागृतीपर कार्यक्रमही राबविले. परंतु, आजही ग्रामीण भागात परिस्थिती जैसे थे दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक जण हे उघड्यावरच शौचास जातांना दिसतात. सुरुवातीला त्यांच्यावर कारवाईसाठी काही भागात गूड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने उघड्यावर बसणाºयांना गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे पुष्प देऊन त्यांना शौचालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही परिस्थिती बदलत नसल्याने दंडात्मक कारवाईही झाली. परंतु, आता अशा पथकांमार्फत उघड्यावर शौचास बसणाºयांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात २७ मार्चपर्यंत  वैयक्तिक शौचालय बांधकामांचे ९८.२६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात साक्री व शिरपूर तालुक्यात प्राप्त उद्दिष्टांपैकी वैयक्तीक शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. तर धुळे व शिंदखेडा तालुक्यात तब्बल ४ हजार ६२६ कामे अद्याप प्रलंबित आहेत. ही कामे ३१ मार्चच्या आत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला जोर लावावा लागणार आहे. अशा परिस्थितीत ही कामे येत्या पाच दिवसात पूर्ण होतील, असा दावा जि.प. प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. 
जिल्ह्यासाठी १ लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट 
जि.प. प्रशासनाला २०१७-१८ या वर्षात १ लाख २५ हजार ३० वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ९८ हजार ११२ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली होती. आता साक्री व शिरपूर तालुक्यातल वैयक्तीक शौचालयांची १०० टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. तर धुळे तालुक्यात ४ हजार ४ व शिंदखेडा तालुक्यात ६२२ कामे ही अपूर्ण आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहे. शिंदखेडा तालुक्यातील वैयक्तीक शौचालयांची शिल्लक कामे येत्या दोन दिवसात पूर्ण होतील, अशी माहिती जि.प. प्रशासनाने दिली आहे. 

धुळे तालुक्यात सर्वाधिक कामे प्रलंबित 
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयांसाठी प्राप्त उद्दिष्टांपैकी धुळे तालुक्यातील ११२ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक ४ हजार ४ कामे ही अपूर्ण आहेत.  तर शिंदखेडा तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींमध्ये ६२२ कामे ही प्रलंबित आहेत. या ग्रामपंचायतींतर्गत वैयक्तीक शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहे. तर साक्री तालुक्यातील १४६  ग्रा. पं. व शिरपूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींमध्ये वैयक्तीक शौचालयांची कामे ही पूर्ण झाली आहे. 

Web Title: Pending work of 4 thousand toilets in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.