लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर निदर्शनं करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:30 PM2019-02-24T22:30:11+5:302019-02-24T22:30:54+5:30
कृषी विद्यापीठ : युवा सेनेने व्यक्त केला बैठकीत निर्धार
धुळे : जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठाची घोषणा करून दोन ते तीन दिवस झाले आहे़ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याविषयावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही़ म्हणून लोक प्रतिनिधीच्या घराबाहेर निदर्शन करण्याचा निर्धार युवासेनेच्या बैठकीत करण्यात आला़
कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवा सेनेची रविवारी बैठक घेण्यात आली़ यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पंकज गोरे, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख ऐश्वर्या अग्रवाल, शहरप्रमुख संदीप मुळीक, हरीश माळी, अंकिता गुजर, राज माळी, जीत पाटील, गोकुळ देवरे, मयूर निकम उपस्थित होते.
कृषी विद्यापीठासाठी जिल्ह्याचे ठिकाण योग्य आहे़ मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे कृषी विद्यापीठाच्या विषयाला तत्वत: मान्यता देऊन जिल्ह्यावर अन्याय केला आहे़ पन्नास वर्ष जुने कृषी महाविद्यालय तसेच तब्बल ७५० एकर जागा, राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण असताना देखील अन्यायकारक निर्णय घेतला आहे़ ९ ते १० वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली़ मात्र, दोन ते तीन वषापुर्वी जळगाव येथे कृषी विद्यापीठ व्हावे अशी मागणी माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती़ त्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शवुन धुळेकरांच्या अपमान केला आहे़ मुख्यमंत्र्यांचा या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी सोमवारी संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या घराबाहेर निदर्शने, मंगळवारी शहराचे आमदार अनिल गोटे, बुधवारी दोंडाईचा येथे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या घराबाहेर शिंदखेडा तालुका युवा सेनेतर्फे निदर्शने केली जाणार आहे़ तर गुरुवारी नाकर्ते मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी अशा सर्वांचा मिळून एका पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.