पेट्रोलची वाटचाल आता शंभरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:30 PM2021-01-24T22:30:47+5:302021-01-24T22:32:05+5:30
सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ हाेत आहे. मात्र जिल्ह्यातील काही पक्ष व संघटनाकडून वाढत्या दरवाढी विरोधात आवाज उठविण्यास दुर्लक्ष करीत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
तेल कंपन्याकडून २०१७ ते २०२१ पर्यतच्या ५ वर्षाच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात २४ रूपये ४२ पैशांनी वाढ केली आहेत. तर डिझेल ५६ रूपयांवरून ८२ रूपयांवर येवून पोहचले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. त्यामुळे नवीन दर सकाळी ६ वाजल्या पासुन लागु होतात. त्यामुळे या महिन्यात ७ जानेवारी रोजी पेट्रोलचे भाव ९०.७५ पैस तर डिझेल ७९.७९ रूपये होते. पंधरा दिवसानंतर २२ जानेवारी रोजी पेट्रोल ९१.७१ तर डिझेल ८१.९५ पैशांनी वाढ झाली आहे. ही दिवसभरात काही पैशांनी पेट्रोल, डिझेलच्या किमंती वाढ होत असली तरी पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. असे असतांनाही पक्ष संघटना का नागरिकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही. असा प्रश्न पडला आहे. नागरिकांच्या हितासाठी पुढे येण्याची अपेक्षा केली जात आहे.