फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, तापी नदीपात्रात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 20:00 IST2023-06-23T19:59:27+5:302023-06-23T20:00:54+5:30
तीन दिवसापूर्वी रुममधून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असतांना तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, तापी नदीपात्रात आढळला मृतदेह
धुळे - शिरपूर येथे एम. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तो तीन दिवसापासून रुममधून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरु असतांना तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नांद्रा येथील राहुल नामदेव पाटील वय २२ हा शिरपूर येथील आर. सी पटेल फार्मसी महाविद्यालयात एम. फार्मसी च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. गेल्या चार वर्षांपासून तो शिरपूर येथे शिक्षण घेत होता. दि २१ रोजी त्याचे एम. फार्मसीची परीक्षा होती. मात्र तो आजारी असल्याने त्याने पेपर दिला नव्हता. दि २१ रोजी सायंकाळी रुममध्ये अभ्यास करत असतांना तो करवंद नाका येथून रिक्षा स्टॉप जवळ गेला व तेथून बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध सुरु असतांना राहुल कुठेही मिळुन आला नाही. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा शोध सुरु असतांना सावळदे गावाजवळील तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार होत. त्याचे आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.