पिंपळनेरला दुचाकी चोरणारी टोळी केली गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:09 PM2018-05-03T23:09:09+5:302018-05-03T23:09:09+5:30
पोलीस प्रशासन : १७ दुचाकी जप्त, दोघांना पोलीस तर एकाला न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दुचाकी चोरणारी टोळी पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने पकडली आहे. त्यांच्याकडून १७ दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींची संख्या चार झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती़ पिंपळनेर पोलीस स्टेशनला सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पी़ जे़ राठोड रुजू झाल्यानंतर गावातीलच हॉटेल प्रभात जवळून एकाची दुचाकी लंपास झाली होती़ पोलिसांनी त्याचा तपास करीत होते. २८ एप्रिल रोजी पिंपळनेर येथील हर्षल ज्ञानेश्वर पाटील (२०) या संशयिताला अटक केली होती़ त्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती़ त्यातून १७ दुचाकीचा तपास लागला़ यात तीन जणांची नावे समोर आली. पोलिसांनी त्यांना बुधवारी सायंकाळी अटक केली. या संशयितांना आज साक्री न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यापैकी सुनील ताराचंद पवार (२२, रा़ इंदिरानगर, पिंपळनेर) आणि जयेश संजय पाटील (२०, हरिओम नगर, पिंपळनेर) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी , तर निलम रेवाजी कुवर (२०, रा़ मांजरी ता़ साक्री) याला १५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटकळ, लोकेश पवार, हेड कॉन्स्टेबल प्रविण अमृतकर, धनंजय मोरे, पोलीस नाईक सुनील जावरे, ललित पाटील, कॉन्स्टेबल भूषण वाघ, विशाल मोहने, ग्यानसिंग पावरा, रविंद्र राजपूत, सुनील साळुंके यांनी तपासकामी परिश्रम घेतले़