पिंपळनेर पूर्ण लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:11 PM2020-04-10T22:11:32+5:302020-04-10T22:11:54+5:30

१५ एप्रिलपर्यंत बंद : दुकान उघडे ठेवणाऱ्यावर होणार कारवाई

Pimplener full lockdown | पिंपळनेर पूर्ण लॉकडाऊन

dhule

googlenewsNext

पिंपळनेर : येथील ग्रामपंचायत ग्रामस्तरीय समितीने गाव बंद ठेवत आज शहर पूर्ण लॉकडाऊन ठेवले. एक दुकान उघडे दिसले. ते ग्रामस्तरीय समितीने सील केले. १५ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन पाळले नाहीतर दुकान उघडे ठेवणाºयावर कारवाई करुन ते सील करण्यात येईल, असा इशारा उपसरपंच विजय गांगुर्डे यांनी दिला.
कोरोना या संसर्गजन्य विषाणू आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी व त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी पिंपळनेर सामोडे ग्रामपंचायतीने निर्णय १४ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. मालेगाव येथे रुग्ण आढळून आले. पिंपळनेर शहरात दररोज मालेगाव येथून भाजीपाला येतो. दक्षता म्हणून ग्रामपंचायतीने तातडीने शुक्रवारपासून १५ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.
ग्रामस्तरीय समितीचे गठण - लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामस्तरीय समितीचे गठण करण्यात आले. गुरुवारी सकाळी ग्रामस्तरीय समितीचे सदस्य सरपंच साहेबराव देशमुख, उपसरपंच विजय गांगुर्डे, ग्रा.प. सदस्य प्रमोद गांगुर्डे, रवींद्र पगारे, ग्रामविकास अधिकारी डी.डी. चौरे व ग्रामपंचायत कर्मचारी हे गावातून पाहणी केली.
एक दुकान सील - गावाची पाहणी करीत असतांना नानाचौकात एका व्यापाºयाचे गोदाम उघडे दिसल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ग्रामस्तरीय समितीने दुकान सील केले आहे.
दिवसभर या समितीच्या माध्यमातून गावात फेरफटका घेतला जात होता. कारवाईच्या धाकाने कुठल्याही दुकानदाराने उघडण्याचा प्रयत्न दिवसभर केला नाही. तसेच भाजी विक्रेत्यांना ही बंदी घालण्यात आलेली आहे.
ग्रामस्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयामुळे गुरुवारी खेड्यावरील कुठलाही व्यक्ती शहरात दिसून आला नाही तसेच अनोळखी व्यक्तीला त्वरित घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. पिंपळनेर- सामोडे ग्रामपंचायतीने या घेतलेल्या बंदच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Web Title: Pimplener full lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे