जुने धुळेतील घरासह पिंप्रीत खळ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:10 PM2019-04-12T22:10:28+5:302019-04-12T22:11:09+5:30

आगीच्या दोन घटना : संसारोपयोगी साहित्यासह चारा जळून खाक, अग्नी उपद्रवची नोंद

 Pimpri Khanna fire in Old Dhule house | जुने धुळेतील घरासह पिंप्रीत खळ्याला आग

dhule

Next

धुळे : जुने धुळे भागातील सुपडू आप्पा कॉलनीतील एका घराला आणि तालुक्यातील वडजाई-प्रिंपी येथील खळ्याला लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ अग्नीउपद्रवची नोंद पोलिसांच्या दप्तरी करण्यात आली असून या दोनही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़
सुपडू आप्पा कॉलनी
जुने धुळे भागात असलेल्या सुपडू आप्पा कॉलनी परिसरातील देविदास कॉलनीत गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका दुमजली घराला आग लागली़ शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात असून आगीत जवळपास हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़ देविदास कॉलनीतील विनोद विजय जगताप यांच्या दुमजली घराला लागलेल्या आगीत दुसऱ्या मजल्यावरील फ्रिज, मिक्सरसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ या आगीत वस्तुंचे नुकसान झाले असून यात सुमारे ९० ते ९५ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ यात रोख रक्कमही जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे़ आगीची माहिती अग्नीशमन विभागाला कळविण्यात आली़ तातडीने बंब दाखल होताच पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यात आली़ सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही़
पिंप्री शिवारातील घटना
धुळे तालुक्यातील वडजाई पिंप्री शिवारात देवरे नामक शेतकºयाचे चारा ठेवण्यासाठी गोडावून आहे़ या गोडावूनमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ आग लागल्याचे कळताच आग विझविण्यासाठी शेतमजुरांनी प्रयत्न केले़ तोपर्यंत महापालिकेचा अग्नीशमन बंब दाखल झाल्यानंतर पाण्याचा मारा करण्यात आला़ आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले़ तो पर्यंत हजारो रुपयांचा चारा जळून खाक झाला होता़ तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली़

Web Title:  Pimpri Khanna fire in Old Dhule house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे