धुळ्य़ात हाणामारीदरम्यान रोखले पिस्तूल

By admin | Published: May 31, 2017 11:36 AM2017-05-31T11:36:26+5:302017-05-31T11:36:26+5:30

या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आह़े

Pistol thrown during a dusty battle | धुळ्य़ात हाणामारीदरम्यान रोखले पिस्तूल

धुळ्य़ात हाणामारीदरम्यान रोखले पिस्तूल

Next

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 30 - क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन यात लोखंडी सळईचा वापर करत पिस्तूलही रोखण्यात आली़ यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होत़े घटनेचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल़े या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आह़े त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आह़े विशेष म्हणजे यात महापालिकेचे माजी शिक्षण सभापती संदिप महालेंसह 14 जणांविरुध्द  गुन्हा दाखल झाला़
किरण अहिरे हा विक्की परदेशी आणि संतोष परदेशी यांच्यासोबत राहतो याचे वाईट वाटल्याच्या कारणावरुन शहरातील चाळीसगाव रोडवरील श्रीराम पेट्रोलपंपाजवळ   हाणामारीची ही घटना घडली़ या हाणामारीत सर्रासपणे लोखंडी सळईचा वापर झाला़  याशिवाय एकाने तर पिस्तुलच काढली़ यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होत़े हाणामारीमुळे चौकात काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी़ व्ही़ वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक बी़ डी़ पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे घटनास्थळी पोलीस कुमकसह दाखल झाल़े तणावपूर्ण होत असलेले वातावरण शांत करण्यात आल़े याप्रकरणी किरण कन्हैय्यालाल अहिरे (28) रा़ धुळे याने  शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपींविरुध्द गुन्न्हा दाखल करण्यात आला. 
हाणामारीतील आरोपी
किशोर मधुकर जाधव, आकाश गुजर, आकाशचा चुलत भाऊ, संदिप दत्तात्रय महाले, मंगल गिरधर गुजर, पंकज गणेश सूर्यवंशी, अमोल मधुकर जाधव, सचिन अरुण कर्णे, किशोर वाघ, रोशन भटू पारखे, रितेश वारकर, बंटी सूर्यवंशी, गोलू धनगर, सुनील बंडू गवळी यांचा समावेश आह़े 

Web Title: Pistol thrown during a dusty battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.