आता दोन मिनिटात खोदला जाणार वृक्षारोपणासाठी खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 07:47 PM2019-06-23T19:47:34+5:302019-06-23T19:48:16+5:30

महापालिका । सव्वालाख वृक्षारोपणासाठी प्रशासन सज्ज

Pitch for tree plantation now in two minutes | आता दोन मिनिटात खोदला जाणार वृक्षारोपणासाठी खड्डा

dhule

Next

धुळे : शासनाकडून वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत तब्बल १ लाख २६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ कमी वेळात अधिक खड्डे खोदण्यासाठी कर्मचाऱ्यांना पोखर यंत्र हताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे़ या यंत्राव्दारे दोन मिनिटाला एक खड्डा खोदला जाणार आहे़
वृक्षलागवडीसाठी शहरातील प्रत्येक प्रभागाला उद्दिष्ट दिले जाणार असून रोपे देखील पुरविली जाणार आहेत़ शिवाय लागवड झालेल्या वृक्षांचे ‘जिओ टॅग’ फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत़ प्रत्येक प्रभागाला जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यानुसारच रोपांचे वितरण होणार केले जाणार आहे़
२४९ जागांवर वृक्षलागवड
वृक्षलागवडीची मोहिम केवळ शहरातच नव्हे तर जिल्हाभरात राबविली जाणार असल्याने या मोहिमेचा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आढावा घेतला आहे़ त्यानुसार वनविभागाकडे आधीच रोपांची मागणी नोंदविण्यात आली असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले़ शासनाने येत्या जुलै महिन्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड मोहिमेसाठी मनपाला तब्बल १ लाख २६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे़ टॉवर बगिचा, पांझरा जल केंद्राच्या आवारात, महापालिकेच्या जागा, आरोग्य केंद्र, मनपा क्षेत्रातील सर्व १९ प्रभाग शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाण, अमरधाम, हद्दवाढ क्षेत्रातील अवधान, वरखेडी, चितोड, नकाणे, बाळापुर, प्रिंपी, मंहिदळे, आदी ठिकाणी नियोजन केले आहे़ शासनाने येत्या जुलै महिन्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड मोहिमेव्दारे शहरातील एकूण २४९ जागांवर वृक्षलागवडीचे नियोजन आहे़
महिन्याअखेर खड्डे पुर्ण
१ लाख २६ हजार वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत ६० हजार वृक्षांची लागवड मनपा कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे़ तर उर्वरित वृक्षांची लागवड लोकसहभागाव्दारे होणार आहे़ त्यासाठी ३० जूनपर्यत ६० हजार खड्डे पोखर यंत्राव्दारे खोदण्यात येत आहे़ त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ या यंत्राव्दारे दोन मिनिटात एक खड्डे खोदला जाईल़
२५ समन्वयकांची नियुक्ती
मनपाच्या उपलब्ध मनुष्य बळातुन कनिष्ठ अभियंता, सहाय्यक सार्वजनिक आरोग्यधिकारी, स्वच्छता निरीक्षक, लिपीक अशा एकून २६ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयकांना प्रत्येकी चार हजार ८६८ वृक्ष लागवडीचे उदिष्ठे देण्यात आले आहे़ त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे़ वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांना सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़
जिल्हासाठी ६५.७६ लाख रोपांचे उदिष्टे
जिल्ह्यासाठी ६५.७६ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनाचे विविध विभाग, महाविद्यालयांना वृक्षा रोपणाचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. जिल्ह्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व कृषी विभागाने ८४ लाख रोपे रोपवाटिकेत तयार केले आहेत.

Web Title: Pitch for tree plantation now in two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे