दोंडाईचा-साक्री रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 09:39 PM2019-12-29T21:39:00+5:302019-12-29T21:39:31+5:30

मालपुर : प्रवाशी व वाहनधारकांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी

Pits on Dondicha-Sakri road | दोंडाईचा-साक्री रस्त्यावर खड्डे

Dhule

Next


मालपूर : शिंदखेडा तालुक्यातून जाणाऱ्या दोंडाईचा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
दोंडाईचा- साक्री रस्त्याची खड्ड्यांमुळे पार दुरवस्था झाली आहे. साईडपट्टयांवरुन काही ठिकाणी खाजगी कंपनीचे केबल वायर टाकण्यात आल्याने साईडपट्ट्या खचल्या आहेत. या रस्त्यावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. मात्र, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता धोकेदायक ठरत आहे. अनेकदा वळणावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार घसरुन पडून अपघाताच्या घडत आहेत. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोंडाईचाहून साक्रीकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. तसेच याच रस्त्यावरून जैन समाजबांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या बळसाने येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दुरदुरवरुन येतात. मात्र, रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून साईडपट्टयांवरुन खाजगी कंपनीने जेसीबीच्या सहाय्याने खोदून केबल वायर टाकल्यामुळे तेथील भराव खचला आहे. यामुळे साईडपट्टयांवर वाहन उतरविणे देखील जोखमीचे झाले आहे. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत असून प्रवाशी व वाहन चालकांनी वेळोवेळी रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशीवर्गाकडून होत आहे.

Web Title: Pits on Dondicha-Sakri road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे