ंमहानगरात बारा सूक्ष्म कंटेन्मेंट झोनचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:09 PM2020-05-08T22:09:47+5:302020-05-08T22:10:30+5:30

महापालिका : पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ; अधिकारी व कर्मचारी नियुक्त

Planning of twelve micro containment zones in the metropolis | ंमहानगरात बारा सूक्ष्म कंटेन्मेंट झोनचे नियोजन

dhule

Next

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून विविध उपाय-योजना केल्या जात आहे़ खबरदारी म्हणून यापुढे देखील दक्षता घेण्याची गरज आहे़ त्यासाठी शहरात १२ सूक्ष्म कंटेन्मेंट झोन तयार केले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करण्यासाठी मनपाकडून पथकाला प्रशिक्षण दिले आहे़
कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या रहिवासाच्या दीड किलोमीटर क्षेत्रात कंटेन्मेंट झोन जाहीर केले जाते. शहरात यापूर्वी नऊ कंटेन्मेंट क्षेत्र निश्चित केले आहेत. या क्षेत्रात आवश्यक व प्रतिबंधात्मक उपाययोजना मनपातर्फे सुरू आहेत. लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवला आहे. त्यानुसार कंटेन्मेंट प्लानच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्या भागातील तपासणी, स्वच्छता व वैद्यकीय उपचार सक्षमतेने व्हावे यासाठी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. कंटेन्मेंट क्षेत्रात सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या पथकाची पुनर्रचना केली आहे. प्रत्येक कंटेन्मेंट क्षेत्रासाठी एक नियंत्रण अधिकारी, एक पर्यवेक्षक असे ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Web Title: Planning of twelve micro containment zones in the metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे