शिंदखेडा, दोंडाईचा येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लँट साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:45 AM2021-04-30T04:45:33+5:302021-04-30T04:45:33+5:30
दोंडाईचा नगरपालिकेच्या सभागृहात आमदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रांत अधिकारी ...
दोंडाईचा नगरपालिकेच्या सभागृहात आमदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रांत अधिकारी डॉ. विक्रम बांदल, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे, मुख्याधिकारी प्रवीण निकम, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, देविदास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी भूषण मोरे, डॉ. हितेंद्र देशमुख, डॉ. भूषण काटे, नगरसेवक रवी उपाध्ये, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, हितेंद्र महाले, भरतरी ठाकूर, डॉ. सचिन पारख, प्रफुल्ल दुग्गड, डॉ.जयेश ठाकुर, डॉ तेजस जैन, डॉ. अनिकेत पाटील, संजय चंदने , अभियंता जगदिश पाटील, शिवनंदन राजपूत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्याधिकारी प्रवीण निकम यांनी सांगितले की, पालिकेच्या माध्यमातून शहरात रॅपिड टेस्ट केल्या जात असून सद्यस्थितीत शहरात ४० कंटेनमेंट झोन आहेत. शिवाय ऑक्सिजन वाहतुकीसाठी पालिकेने १ पीकअप व्हॅन ड्रायव्हर व ३ कर्मचारी दिले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ६ टीम तयार केल्या आहेत. लसीकरणासाठी देखील ७ टीम तयार केल्या असून त्यात १४ कर्मचारी दिलेले आहेत. आजपर्यंत दोंडाईचा शहरात ६६६२ एवढ्या लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. तर तालुका आरोग्याधिकारी भूषण मोरे यांनी तालुक्यातील लसीकरण व ॲक्टिव रूग्णांचा आढावा दिला.
आमदार रावल म्हणाले, ग्रामीण भागात देखील यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यासाठी ग्रामपंचायतींना देखील योग्य त्या सूचना देण्याबाबत प्रांताधिकारी विक्रम बांदल याना सांगण्यात आले आहे. लसीकरणाच्या बाबतीत आ.जयकुमार रावल यांनी नाराजी व्यक्त केली असून शिंदखेडा तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची माझी तयारी असून काही समाजसेवी संस्थांनी देखील पुढे येऊन लसीकरण कार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान यावेळी प्रांत अधिकारी विक्रम बांदल व आ.रावल यांनी खाजगी रूग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा बाबत देखील आढावा घेतला.