आदिवासी भागातून खेळाडू पुढे आले पाहिजेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:27 PM2019-01-08T22:27:29+5:302019-01-08T22:27:48+5:30
डॉ़ तुषार रंधे: बोराडी येथील स्पर्धेत प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : ग्रामीण भागातूनच अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात. आदिवासी खेळाडूंमध्ये खेळासंबंधित अनेक कौशल्य असतात. बोराडी सारख्या आदिवासी भागातील खेळाडू राज्यस्तरावर जातात ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन किसान विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन डॉ.तुषार रंधे यांनी केले.
बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव रणधीर वरीष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संजय हिंमत मोते याची खो-खो या खेळात विद्यापीठातून राज्यस्तरावर निवड झाली आहे. यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, पी.एस.अंतुर्लीकर, प्रकाश भोमा पाटील, चंदुलाल तिवारी, राधेश्याम शर्मा, राधेश्याम दायमा, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, आर.एफ.पाडवी, आनंदसिंग राऊळ, बी.डी.पाटील, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, गोकुळ कुंभार, सुकदेव मालचे,अशोक महाजन, विजय देवरे, भागवत पवार, प्रमोद पवार, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते. विकास मुखडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.