पत्ते खेळताना २० जुगाºयांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:46 AM2018-02-14T11:46:54+5:302018-02-14T11:47:37+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची तरवाडेत कारवाई : १६ हजारांची रक्कम जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील तरवाडे गावात एका घरात जुगार खेळणाºया २० जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले़ त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १६ हजार १७० रुपये जप्त करण्यात आले आहे़
धुळे तालुक्यातील तरवाडे गावात सिताणे रोडलगत प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आदिवासी वस्तीत हिरामण रामदास सोनवणे याच्या घरात पत्त्याचा डाव पैसे लावून खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, महेंद्र कापुरे, पोलीस कर्मचारी चेतन कंखरे, विजय सोनवणे, विजय मदने या पथकाने तरवाडे गावात हिरामण सोनवणे यांच्या घरात दुपारी २ वाजेच्या सुमारास धाड टाकली़ त्यावेळी झन्नामन्ना नावाचा ५२ पत्त्यांचा जुगाराचा खेळ पैसे लावून खेळत असल्याचे स्पष्ट झाले़
घटनास्थळावरुन २० जणांना ताब्यात घेण्यात आले़ त्यात, हिरामण रामदास सोनवणे (रा़ तरवाडे ता़ धुळे), भाऊसाहेब शामराव पाटील (रा़ तरवाडे ता़ धुळे), गोविंद बद्रीनाथ पवार (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), अशोक गरुड माळी (रा़ तरवाडे ता़ धुळे), समाधान दगा माळी (रा़ बोरकुंड ता़ धुळे), रघुनाथ अर्जुन पवार (रा़ तरवाडे ता़ धुळे), मुकेश सखाराम माळी (रा़ तरवाडे ता़ धुळे), शांताराम नामदेव भिल (रा़ तरवाडे ता़ धुळे), दिलीप उदयसिंग राठोड (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), रज्जाकशहा महेबुबशहा फकीर (रा़ तरवाडे ता़ धुळे), भानुदास रावजी पवार (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), नवनाथ सरिचंद पवार (रा़ मोरदडतांडा ता़ धुळे), पिंटू बालू भिल (रा़ तरवाडे ता़ धुळे), बका भुरा राठोड (रा़ चांदे ता़ धुळे), कैलास अभिमन माळी (रा़ दरेगाव ता़ चाळीसगाव), हेमंत सुरेश भामरे (रा़ कुंझर ता़ चाळीसगाव), किशोर रामदास पाटील (रा़ बोरकुंड ता़ धुळे), चुनीलाल नथ्थू चव्हाण (रा़ सिताणे ता़ धुळे), रुपचंद रामलाल जाधव (रा़ सिताणे ता़ धुळे), भैय्या अशोक मालचे (रा़ तरवाडे ता़ धुळे) यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून १६ हजार १७० रुपये देखील जप्त करण्यात आले़ त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल.