प्लॅस्टिक पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी महिनाभराची मुदत द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 05:15 PM2018-03-26T17:15:58+5:302018-03-26T17:15:58+5:30

धुळयातील व्यावसायिकांची मागणी, महापालिकेला निवेदन

Pledge a month for the disposal of plastic bags! | प्लॅस्टिक पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी महिनाभराची मुदत द्या!

प्लॅस्टिक पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी महिनाभराची मुदत द्या!

googlenewsNext
ठळक मुद्दे- घाईगर्दीत कारवाई करणार नसल्याचे मनपाचे स्पष्टीकरण- महापालिका प्रशासनाला व्यावसायिकांचे निवेदन- विक्रेत्यांकडे लाखो रूपयांचे प्लॅस्टिक साहित्य पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : प्लॅस्टिक पिशव्या व साहित्यावर शासनाने बंदी घातली आहे़ परंतु सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळावी, अशी मागणी प्लॅस्टिक विक्रेत्यांनी सोमवारी मनपा उपायुक्तांकडे निवेदनाव्दारे केली़
शासनाने प्लॅस्टिक पिशव्या व विविध प्रकारच्या साहित्यावर बंदी घातली असून त्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे़ सदर अधिसूचना मनपा प्रशासनाला प्राप्त झाली आहे़ मात्र सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या व साहित्याचा साठा याची विल्हेवाट लावण्यासाठी मुदत देण्यात यावी तसेच लाखो रूपयांच्या प्लॅस्टिक मालाची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी प्लॅस्टिक विक्रेत्यांनी मनपा उपायुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे़ यावेळी प्लॅस्टिक विक्रेते उपस्थित होते़  दरम्यान, प्लॅस्टिक बंदीची अधिसूचना प्राप्त झाली असल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे़ मात्र घाईगर्दीत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़ प्लॅस्टिकवर ‘लेट’ पण थेट कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़ 

 

Web Title: Pledge a month for the disposal of plastic bags!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.