गारठा काव्य संमेलनात राज्यातील कवींची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:06 PM2018-12-24T12:06:51+5:302018-12-24T12:07:17+5:30
महाकवी कालिदास कट्टा : महोत्सवातून विविध विषयांवर चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील चितळे माध्यमिक विद्यालयात रविवारी महाकवी कालिदास कविकट्टातर्फे गारठा काव्य संमेलन घेण्यात आले़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री विजया भट होत्या.
प्रमुख पाहूणे मध्यप्रदेश येथील काशीनाथ पवार, डॉ विजयचंद्र जाधव डॉ़ संघवी, प्रा़ प्रभा बैकर, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते़ अध्यक्ष भट यांच्याहस्ते भारतमातेची प्रतिमा पूजन करण्यात आले़ संमेलनाचे प्रास्ताविक महाकवी कालिदास कविकट्टाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर पांडे यांनी केले़ ज्येष्ठ कवी कासार यांनी काव्य संमेलनाची सुरुवात केली़ प्रकाश ठोंबरे, ललित कुलकर्णी, प्रवीण पवार, अशोक शिरसाठ यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले़ काव्य महोत्सवात प्रथम बक्षीस ललित कुळकर्णी तर व्दितीय बक्षिस प्रवीण पवार यांना मिळाले़ त्यांचा महाकवी कालिदास कविकट्टातर्फे सत्कार करण्यात आला़
कवितांचे सादरीकरण
संमेलनात दत्ता कल्याणकर यांनी संघर्ष परिस्थितीसोबत, संजय धनगव्हाळ यांनी राजकारण, डॉ. रमेश जैन यांनी गझल, ज्येष्ठ कवी काशिनाथ पवार यांनी कविता, भास्कर अमृतसागर यांनी संविधानसे देश चलेगा, प्रा़ सदाशिव सुर्यवंशी, महंमद शफी, चंद्रशेखर कासार, हिरामण पाटील, सुमन महाले, सागर तापकीर, रमेश बोरसे, प्रा़ प्रभा बैकर, विजयचंद्र जाधव, भटू गिरमकरे, राजेश सोनार, रमेश राठोड, सुलोचना अग्रवाल, प्रकाश दुगल, भाग्यश्री पाटील, मुरलीधर पांडे आदी कवींनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. संमेलनाच्या अध्यक्षा विजया भट यांच्या अध्यक्षीय कवितेद्वारे गारठा काव्य संमेलनाची सांगता झाली. यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होती.