विषबाधेने 18 मेंढय़ा, एक घोडा मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 12:31 AM2017-02-16T00:31:36+5:302017-02-16T00:31:36+5:30
धमाणे शिवारातील कपाशीच्या शेतात पुंडलिक दगडे यांच्यासह अन्य ठेलारींच्या तब्बल 18 मेंढय़ा व एक घोडा चा:यातून विषबाधा झाल्याने मुत्युमुखी पडल्याची घटना घडली.
कापडणे : येथील धमाणे शिवारातील कपाशीच्या शेतात पुंडलिक दशरथ दगडे रा. वाघापूर ता.साक्री यांच्यासह अन्य ठेलारींच्या तब्बल 18 मेंढय़ा व एक घोडा चा:यातून विषबाधा झाल्याने मुत्युमुखी पडल्याची घटना घडली.
कापडणे येथील धमाणे शिवारातील कपाशीच्या शेतात वाघापूर येथील मेंढपाळ आले आहेत. 14 व 15 फेब्रुवारी या दोन दिवसादरम्यान तब्बल 18 मेंढय़ांसह, एका घोडय़ाचा चा:यातून विषबाधा झाल्याने मुत्यू झाला आहे.
ठेलारी बांधवांचे नुकसान
पुंडलिक दगडे यांनी सांगितले की, या घटनेने तीन ठेलारी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. माङयासह भगवान लखा खतळ, आण्णा लखा खतळ यांची एकूण 35 ते 40 जनावरे मुत्यू पावली आहेत. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामा करताना केवळ 18 मेंढय़ा व एक घोडा मृत सापडलेली आहेत. प्रत्यक्षात 35 ते 40 जनावरे मृत पावलेली आहेत. उर्वरित जनावरे दोन दिवस झाल्याने कुत्र्यांनी इकडे तिकडे लांब अंतरापयर्ंत व दुस:या शिवारात ओढत नेऊन फस्त केली आहेत. यामुळे सुमारे 35 ते 40 जनावरे मृत पावल्याची शक्यता आहे. तसेच पुढेही काही जनावरे दगावण्याची शक्यता आहे.
मृत जनावरांचा पंचनामा
कापडणे तलाठी व्ही.पी. बेहरे, व कोतवाल रवींद्र राजधर भामरे यांनी 15 रोजी दुपारी तीन वाजता धमाणे शिवारात घटनास्थळी जाऊन मृत जनावरांची माहिती घेऊन पंचनामा केला आहे. त्या पंचनाम्यात विषबाधा झाल्यामुळे जनावरे दगावली आहेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. पंचनाम्यावर पंच म्हणून अरविंद विनायक पाटील, भीमराव विनायक पाटील यांची स्वाक्षरी आहेत. नुकसानग्रस्त ठेलारी पुंडलिक दगडे यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला व पंचनाम्याची सत्य प्रत, निवासी नायब तहसीलदार, धुळे ग्रामीणचे रावसाहेब गुरव यांच्याकडे देण्यात आली आहे.
मृत जनावरांचा आकडा वाढण्याची शक्यता!
तीन ठेलारी मिळून एकूण 35 ते 40 जनावरे मुत्यू पावली आहेत. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामा करताना केवळ 18 मेंढय़ा व एक घोडा मृत आढळला. प्रत्यक्षात 35 ते 40 जनावरे मृत पावलेली आहेत. उर्वरित जनावरे दोन दिवस झाल्याने कुत्र्यांनी इकडे तिकडे लांब अंतरापयर्ंत व दुस:या शिवारात ओढत नेऊन फस्त केली आहेत. यामुळे सुमारे 35 ते 40 जनावरे मृत पावल्याची शक्यता आहे. तसेच पुढेही काही जनावरे दगावण्याची शक्यता आहे, असे पुंडलिक दगडे यांनी सांगितले.