एमआयएमच्या आमदार पुत्राची पोलिसांना शिवीगाळ, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:21 AM2020-04-17T01:21:30+5:302020-04-17T01:22:16+5:30

पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस शिपाई दिपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

Police abduct MIM MLA son of dhule faruq shah | एमआयएमच्या आमदार पुत्राची पोलिसांना शिवीगाळ, गुन्हा दाखल

एमआयएमच्या आमदार पुत्राची पोलिसांना शिवीगाळ, गुन्हा दाखल

googlenewsNext

धुळे : संचारबंदी असताना बुधवारी रात्री सव्वा बारा वाजेदरम्यान भोला बाजार चौकात घोळका करुन बसलेल्या तरुणांना हटकले असता आमदार पुत्राने पोलिसांशी हुज्जत घातली तसेच तुम्ही दारुच्या नशेत आहात असे म्हणत मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटिंग केले.

पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस शिपाई दिपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदापुत्रासह जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्याचे आमदार फारुक शहा यांचा मुलगा शाहबाज याने तुम्ही दारूप्यायलेले आहात, असे म्हणत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

Web Title: Police abduct MIM MLA son of dhule faruq shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.