पोलिसांवर हल्ला करणारे १३ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:34 AM2018-06-20T05:34:53+5:302018-06-20T05:34:53+5:30
दूरबळ्या या आदिवासी गावात दोन गटांत वाद झाल्याची घटना सोमवारी घडली होती.
शिरपूर (जि. धुळे) : तालुक्यातील दूरबळ्या या आदिवासी गावात दोन गटांत वाद झाल्याची घटना सोमवारी घडली होती. तो सोडविण्यासाठी गेलेल्या सांगवी ठाण्याच्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता़ पोलिसांना झालेल्या या मारहाण प्रकरणी ७० जणांवर जिवे मारणे, दंगल व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
दूरबळ्या गावी जगदीश राजाराम पावरा (२२) याने गळफास घेतल्यानंतर त्याच्या २ महिन्यांच्या मुलीचे संगोपन कुणी करावे, यासंदर्भात चर्चा होत असताना बटवापाडा व दूरबळ्या येथील दोन गटांत वाद झाला़ तो वाद मिटविण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी
गेले होते. तेव्हा तेथे त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यात सहायक पोलीस निरीक्षक किरण खेडकर, हवालदार शामसिंग वळवी, अनंत पवार, राजीव गीते, संजय नगराळे, यमुना परदेशी हे पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.