धुळ्यात दोघा हद्दपार गुंडांना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:45 PM2018-03-19T16:45:07+5:302018-03-19T16:45:07+5:30

शहर पोलिस : गोपनीय शाखेची कामगिरी

Police arrested two exiled detainees in Dhule | धुळ्यात दोघा हद्दपार गुंडांना पोलिसांनी पकडले

धुळ्यात दोघा हद्दपार गुंडांना पोलिसांनी पकडले

Next
ठळक मुद्देहद्दपार असूनही शहरात फिरणाºया दोन गुंडांना केले जेरबंदधुळे शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेची कामगिरीअन्य हद्दपारीत गुंडांकडेही पोलिसांचा वॉच

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोन वर्षासाठी हद्दपार केलेले मिलींद आवटे आणि यशवंत सुरेश बागुल यांना शहरात फिरताना शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले़ दरम्यान, अन्य हद्दपार केलेल्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचा ‘वॉच’ आहे़ 
पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार आणि प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी आपल्या स्तरावर त्रासदायक ठरणाºया काही गुंडांना धुळे शहराससह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे़ तरी देखील काही गुंड हे सर्रासपणे शहरात फिरत असल्याचे समोर येत आहे़ या अनुषंगाने शहरात बिनधास्त फिरणाºया गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिले होते़ त्या अनुषंगाने पोलिसांनी अशा गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे़ 
शहरातील शासकीय दूध डेअरीजवळील भोलेबाबा नगरात राहणारा मिलींद राजेंद्र आवटे (२८) आणि साक्री रोडवरील मिलींद सोसायटीत राहणारा यशवंत सुरेश बागुल (३५) या दोघांना दोन वर्षासाठी शहरासह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार केले होते़ हद्दपार केलेले हे दोघे शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार सापळा लावण्यात आला़ मिलींद आवटेला स्टेशनरोड भागातून तर यशवंत बागुल याला साक्री रोड भागातून ताब्यात घेतले़ मिलींद आवटे प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल किरण जगताप तर यशवंत बागुल प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे करीत आहेत़ 
पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नाना आखाडे, हिरालाल बैरागी, मिलींद सोनवणे, किरण जगताप, दिनेश शिंदे, पंकज खैरमोडे, संदिप पाटील, योगेश चव्हाण, संजय जाधव, प्रल्हाद वाघ, मुक्तार मन्सुरी या पथकाने ही कारवाई केली़ दोघांच्या मुसक्या आवळल्या़ 

Web Title: Police arrested two exiled detainees in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.