पोलीस दादा व दीदी आपल्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:51 AM2019-07-16T11:51:03+5:302019-07-16T11:51:21+5:30
शिंदखेडा : पोलिसांचा अभिवन उपक्रम; मुलामुलींनी बिनदिक्कत समस्या मांडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : शिंदखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत पोलीस दादा व पोलीस दीदी आपल्या दारी असा अभिवन उपक्रम राबविला जात आहे. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी पोलिस्टेशन अंतर्गत ही मोहीम राबवली आहे.
या मोहिमे अंतर्गत त्यांनी पोलिसस्टेशन मधील अपघाताचे रिपोर्ट, पी.एम. नोट, गुन्ह्यासंबंधित कागतपत्र व इतर कागतपत्र ते स्वत: व कर्मचाºयांमार्फत घरी पोहोच करणार आहेत. युवकांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी कायमसरूपी पुरुष व महिला पोलिसांची नेमणूक पोलीस दादा व पोलीस दीदी म्हणून करून त्यांचे मोबाईल नंबर सर्व कॉलेज, शाळांना दिले आहेत. जेणे करून मुली व मुले आपली समस्या त्यांच्याकडे बिनदिक्कत सांगतील. पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. यामुळे मुलींची होणारी छेडखानी रोखता येणार आहे. असे असले तरी शिंदखेड्यातील गुन्ह्यांकडेही गांभीर्याने बघावे, अशी मागणी होत आहे.
शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस आपल्या दारी, हा उपक्रम सुरू केला आहे. याची अंमलबजावणी स्वत: पोलीस निरीक्षक तिवारी, पोलीस कॉन्स्टेबल बिपीन पाटील यांनी नुकतीच सुलवाडे येथील १९ वर्षीय युवती साक्षी मनोज भदाणे ही शेतात कपाशीला खत देतांना तेथील पडलेल्या इलेक्ट्रिक ताराला स्पर्श होऊन जागीच ठार झाली होती. तिचे पीएम रिपोर्ट, स्पॉट पंचनामा व खबरची नक्कल स्वत: सुलवाडे येथे जाऊन तिच्या वडिलांना सर्व कागदपत्र दिले. पोलीस स्टेशनचे मिलींद सोनवणे व तबसुन धोबी यांची पोलीस दादा व पोलीस दीदी म्हणून निवड केली आहे. आज किसान हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पोलीसांशी संपर्क साधावा असे सुचीत केले. यावेळी पर्यवेक्षक एस.एस. पवार, पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे उपस्थित होते.