सोशल मिडियावर चुकीची पोस्ट टाकून आमदारांची बदनामी केल्याप्रकरणी हर्षल विभांडीक विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:42 PM2018-10-02T13:42:12+5:302018-10-02T13:43:11+5:30

मोबाईल हॅक झाला असून तपासासाठी पोलिसात मोबाईल जमा, विभांडीक यांची माहिती

Police file FIR against Harsheel Radhakrishnan for defamation of MLAs by posting wrong post on social media | सोशल मिडियावर चुकीची पोस्ट टाकून आमदारांची बदनामी केल्याप्रकरणी हर्षल विभांडीक विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

सोशल मिडियावर चुकीची पोस्ट टाकून आमदारांची बदनामी केल्याप्रकरणी हर्षल विभांडीक विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देबदनामीकारक पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखलमोबाईल हॅक झाल्याचा होतोय दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सोशल मीडियावरुन आमदार अनिल गोटे, भारतीय सेना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच भारतीय जनता पार्टीची बदनामी करण्यात आल्याप्रकरणी योगेश मुकुंदे यांनी हर्षल विभांडीक यांच्याविरोधात  फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार शहर पोलीस स्टेशनला विभांडीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान  कोणीतरी माझा मोबाईल हॅक करुन हा प्रकार केला आहे. मोबाईल हॅकर शोधण्यासाठी आपण स्वत:च आपला मोबाईल   पोलिसांकडे सुपुर्द केला, असल्याची माहिती डिजिटल क्रांतीचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
आमदार अनिल गोटे यांच्या नावाने व्हॉटसअप व सोशल मीडियावरील इतर माध्यमातून भारतीय सेना, केंद्र आणि राज्य सरकार, भाजपा तसेच आमदार गोटे यांच्यासह भाजपाच्या आजी-माजी पदाधिकाºयांची समाजात बदनामी व्हावी म्हणून एक बनावट व दिशाभूल करणारी बदनामीकारक असत्य कथन करणारी पोस्ट व्हायरल झाली़ या पोस्टमध्ये भाजपनेते सुनील नेरकर, भिमसिंग राजपूत, संजय बोरसे, चेतन महाले, शिरीष शर्मा, अमित खोपडे, अमोल भागवत, नितीन शिंदे, रवि शुक्ला, हेमंत मराठे, नंदू ठोंबरे, दादाभाऊ पहाडी, स्वप्निल कुलकर्णी  हे २ आॅक्टोबर रोजी लोकसंग्राममध्ये प्रवेश करणार आहे़ तसेच यापुढील निवडणूका लोकसंग्रामतर्फे लढवू याशिवाय इतर बदनामी करणारा, दिशाभूल करणारा मजकूरही पोस्टमध्ये टाकण्यात आला़ याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर अशोक नगरात राहणाºया हर्षल विभांडीक यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला़ संशयावरुन त्याच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला फिर्याद देखील झाली़ 
मुलाखतीचे कात्रण सोशल मीडियाद्वारे पाठवित असताना त्यांच्या मोबाईद्वारे एक मेसेज ३ जणांना गेल्याचे लक्षात आले़ त्या तीन मित्रांना ताबडतोब फोन व मेसेजद्वारे खुलासाही करण्यात आला़ संध्याकाळी मुंबईच्या मित्राद्वारे असे लक्षात आले की कोणीतरी फोन हॅक केला आहे़ ही बाब लक्षात आल्यावर बँकींग व सोशल मीडियावरचे अ‍ॅप तात्काळ डिलिट करण्यात आले़ पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे फोन हा तपासणीसाठी देण्यात आला असल्याचे हर्षल विभांडीक यांनी सांगितले़ 
 

Web Title: Police file FIR against Harsheel Radhakrishnan for defamation of MLAs by posting wrong post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.