पोलिसांनी उधळला रंगलेला पत्त्यांचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:43 PM2018-08-27T22:43:18+5:302018-08-27T22:44:28+5:30
गुन्हा दाखल : देवपूरसह होळनांथे येथे कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूर पोलिसांनी खाटीकवाडा परिसरात तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे पत्त्यांचा रंगलेला डाव उधळून लावला़ याप्रकरणी संबंधित १४ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़
देवपूर परिसरात कारवाई
शहरातील देवपूर भागातील खाटीकवाडाजवळ जुगार खेळणाºया पाच जणांना देवपूर पोलिसांनी रंगेहात पकडले़ ही कारवाई रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी जब्बार शेख चांद शेख यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, देवपुरातील खाटीकवाडाजवळ पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी सचिन नारायण करडे (३२ रा़ एकविरादेवी रोड, गल्ली नंबर ७, देवपूर, धुळे), दीपक काशिनाथ मोरे (३८, रा़ कुस्ती स्टेडीअमजवळ, देवपूर धुळे), अतीक शेख यातुब खाटीक (३३, रा़ महम्मदी नगर, देवपूर धुळे), जितू शंकर भोई (४०, एकविरा देवी रोड, देवपूर धुळे), मनोज मोतीलाल भोई (२४ रा़ एस आर पाटील शाळेजवळ, देवपूर, धुळे), या पाच संशयितांना पोलिसांनी रंगेहात पकडले़ झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना ते आढळून आले़ त्यांच्याकडून ४ हजार ६७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली़ ही कारवाई रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़
होळनांथे गावात कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावात जावून मच्छी बाजार लगत एका नवीन इमारतीच्या आडोश्याला सार्वजनिक जागेवर सुरु असलेला पत्ते खेळणाºयांचा डाव उधळून लावला़ ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली़
याप्रकरणी जितेंद्र आनंदसिंग गोसावी (२८), विशाल पदमसिंग चव्हाण (२४), किसन छगन चव्हाण (३०), राजेंद्र न्याहळीक बैसाणे, देविदास रणजित जाधव, रणसिंग जोरसिंग जाधव (४०), रतनसिंग जोरसिंग चव्हाण (६०), दीपक मोहन जाधव (२६), मिथून आनंदगिर गोसावी (२६) यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली़