पोलीस निरीक्षकास मारहाण

By admin | Published: March 24, 2017 12:25 AM2017-03-24T00:25:02+5:302017-03-24T00:25:02+5:30

एकास अटक, सात संशयित फरार

Police inspector beat up | पोलीस निरीक्षकास मारहाण

पोलीस निरीक्षकास मारहाण

Next

धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर वाहन काढून घेण्यास सांगिल्याच्या कारणावरून वाद घालत वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या हातातील लाठी हिसकावून त्यांनाच मारहाण, धक्काबुक्की व दमदाटी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती़ याप्रकरणी आठ जणांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे़, तर इतर फरार आहेत़
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक देवरे (वय ५८) यांच्यासह कर्मचारी २२ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुलीवर पेट्रोलिंग करीत होते़ तेव्हा होली चाईल्ड स्कूलसमोर रस्त्यावर उभ्या ट्रकमुळे (क्ऱ एमएच १८-एसी ०२७९) रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने देवरे यांनी माईकवरून ट्रक काढून घेण्याबाबत सांगितले़ मात्र ट्रकमालक योगेश कंड्रे याने ट्रक काढणार नाही, काय करायचे ते करून घ्या, असे बोलून गर्दी गोळा केली़
शासकीय कामात अडथळा निर्माण करून पुढील शासकीय कारवाई करू नये म्हणून देवरे यांच्या हातातील लाठी हिसकावून  देवरे यांना मारहाण करीत धक्काबुक्की केली़ तसेच दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला़
याप्रकरणी अशोक देवरे यांच्या फिर्यादीवरून हरीश विभुते, पवन विभुते, योगेश कंड्रे, नीलेश प्रकाश विभुते व इतर तीन ते चार जणांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १८८, १८९, ५०४, ५०६ व मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़            पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जयंत शिरसाठ करीत आहेत़
पोलिसांनी पवन विभुते याला अटक केली आहे़, तर इतर संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले़

Web Title: Police inspector beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.