धुळ्यात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:08 PM2018-02-01T12:08:57+5:302018-02-01T12:11:27+5:30
मध्यरात्रीचा थरार : रमेशसिंह परदेशींनी पिस्तुलांतून गोळी झाडली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी (५८) यांनी मध्यरात्री राहत्या घरी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली़ त्यांच्या मेंदूच्या चिंधड्या उडाल्याने क्षणार्धात रक्ताच्या थाळोळ्यात ते पडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू ओढवला़ त्यांची पत्नीही सोबत होती़ पण, काही कळायच्या आत त्यांचा अंत झाला़ दरम्यान, या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची सर्वात मोठी हानी झाली आहे़
पालेशा महाविद्यालयासमोर पोलीस अधिकाºयांचे निवासस्थान आहे़ यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह पोलादसिंह परदेशी यांचे निवास्थान आहे़ नाशिक येथील घरुन बुधवारी सकाळी ते धुळ्यात आले होते़ दैनंदिन काम आटोपल्यानंतर सुध्दा रात्री उशिरापर्यंत परदेशी यांचे काम सुरुच होते़ देवपुर आणि पारोळा रोड भागात त्यांनी रात्री पाहणी देखील केली होती़ कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर ते आपल्या धुळ्यातील शासकीय निवासस्थानी आले़
मध्यरात्रीचा थरार
बुधवारी मध्यरात्री स्वत:च्या पिस्तुलातून डोक्याला त्यांनी गोळी झाडली़ गोळी इतकी जोरात बसली की ती डोक्याच्या उजव्या भागातून निघत डाव्या बाजूला निघाली आणि भिंतीला आदळून समोरच्या भिंतीवर जावून धडकली़ पिस्तुलातून गोळी निघाल्यामुळे आणि रात्रीची शांतता असल्यामुळे आवाज मोठ्या प्रमाणात आला़ आवाज ऐकल्याने शेजारील अधिकारी घटनास्थळी धावले़ त्यावेळेस परदेशी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता़
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
रमेशसिंह परदेशी यांनी पिस्तुलांतून गोळी झाडत आत्महत्या केल्याची बातमी मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह अन्य अधिकारी तात्काळ दाखल झाले़ रुग्णवाहिकेच्या मदतीने परदेशी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ त्यांना तपासून डॉ़ अरुणकुमार नागे यांनी मयत घोषीत केले़
शवविच्छेदन गृहात गर्दी
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून परदेशी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला़ तेथे सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा सिटीस्कॅन करण्यासाठी त्यांचा मृतदेह हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला़ डोक्याचे सिटीस्कॅन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणण्यात आला़ यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते़
सेवानिवृत्तीचा शेवटचा टप्पा
रमेशसिंह परदेशी यांनी आपल्या पोलीस प्रशासनात अनेक पोलीस ठाण्यात आपल्या कार्याची छाप ठेवली होती़ सर्वात सुरुवातीला धुळ्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात ते प्रमुख पदावर विराजमान झाले होते़ त्यानंतर नंदुरबार शहर, जळगाव जिल्ह्यातील पहूर, निंबोरा, भुसावळ बाजारपेठ, मुंबई, जालना वाहतूक शाखा, बदलापूर, परतूर त्यानंतर धुळ्यातील देवपूर, आझादनगर पोलीस ठाण्याचे काम सांभाळल्यानंतर त्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्ती करण्यात आली होती़ मे महिन्यात ते निवृत्त होणार होते़ निवृत्तीचे अवघे तीन महिने शिल्लक असताना अशी विदारक घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे़
अकस्मात मृत्यूची नोंद
बुधवारी रात्री मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक भरत काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली़ त्यानुसार, गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धुळे शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़ ए़ पाटील करीत आहेत़
सुशिक्षित परिवार
त्यांचा परिवार सुशिक्षित आहे़ त्यांची पत्नी संगिता परदेशी असून मुलगी अमृता परदेशी ही ठाणे येथे वित्त लेखा अधिकारी या पदावर कार्यरत आहे़ तर मुलगा अमोल याचा हॉटेलचा व्यवसाय आहे़
नाशिकला अंत्यसंस्कार
रमेशसिंह परदेशी यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने नाशिकला हलविण्यात आले़ नाशिक येथील इंदिरा नगर, आत्मविश्वास सोसायटी, जानकी अपार्टमेंट, रत्नचक्र चौक येथून दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास अंत्ययात्रा निघणार असल्याचे सांगण्यात आले़