धुळ्यातील कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 07:17 PM2019-04-20T19:17:46+5:302019-04-20T19:18:16+5:30

दोन ठिकाणी दिली धडक : गुरांसह गोमांस जप्त, तिघांविरुध्द गुन्हा

Police raid on slaughter houses in Dhule | धुळ्यातील कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा 

धुळ्यातील कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने मिल्लत नगर आणि तेथून जवळच अशा दोन ठिकाणी सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर धाड टाकली़ यावेळी गोमांस आणि गुरे जप्त करण्यात आली़ याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली़ 
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे यांना शंभर फुटी रोड लगत असलेल्या मिल्लत नगर परिसरात कत्तलखाना सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पी़ ए़ शिरसाठ, एस़ बी़  आहेर, हेड कॉन्स्टेबल शंकर महाजन, पोलीस कर्मचारी संदिप कढरे, मुकेश पावरा, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले़ शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या वाहनांतून हा ताफा शंभर फुटी रोडलगत असलेल्या मिल्लतनगर भागात धडकला़ यावेळी आबीद शेख रशीद याच्या गोदामात गोमांस कापले जात असल्याचे निदर्शनास आले़ पोलिसांनी मांस कापणाºया तरुणास ताब्यात घेतले असता असलम खान अख्तर खान (२०, रा़ पूर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) असे असल्याचे सांगितले़ या ठिकाणी पोलिसांनी तीन महिलांसह ५० किलो गोमांस आदींसह १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ 
त्यानंतर पोलिसांचा हाच ताफा मिल्लतनगर परिसरातीलच अय्युब मुर्तुजा कुरेशी यांच्या गोदामात धडकला़ त्या ठिकाणाहून ३० किलो मांस जप्त करण्यात आले़ या ठिकाणी मांस कापताना आरिफ उस्मान कुरेशी (३६) हा तरुण आढळून आला़ ३० किलो मांस सह कुºहाड व लोखंडाचा सुरा असा एकूण ३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ 
या दोघा कारवाई संदर्भात पोलीस कर्मचारी मुकेश पावरा यांनी फिर्याद नोंदविली आहे़ अस्लम खान अख्तर खान, आरिफ उस्मान कुरेशी या दोघांसह गोदाम मालक आबीद शेख रशिद या तिघांवर भादंवि कलम ४२९, २६९, २७८ यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ 

Web Title: Police raid on slaughter houses in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.