जलआंदोलन कर्त्याना पोलिसांनी अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:22 PM2019-03-15T22:22:54+5:302019-03-15T22:23:27+5:30
जिल्हाप्रशासन : नेर फाट्यावर रास्तारोको आंदोलन, प्रशासनाला पदाधिकाऱ्यांचा इशारा
धुळे : अक्कलपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातुन ५० दलघफु पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी जलआंदोलन निघालेल्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नेर फाट्यावर अडविले होते़ महामार्गावर रास्तारोको आंदोलनातुन महामार्गावर वाहतुकींची कोंडी निर्माण झाली होती़
तालुक्यातील अक्कलपाडा धरणाच्या खालील भागात असलेल्या भदाणे, खंडलाय बु़ खुर्द, शिरधाणे, कावडी, मेहरगाव,नेर, देऊर, लोहगाव, लोणखेडी, अक्कलाड, मोराणे, प्ऱनेर आदी गावातील जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे तत्काळ डाव्या व उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात यावे अशी मागणी यापुर्वी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती़ मात्र दखल न घेतल्याने जलसमाधी घेण्याचा पावित्रा महिला पदा धिकाऱ्यांनी घेतला होता़
उजव्या व डाव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ तालुक्यातील नेर फाट्यावरील महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोेंडीनिर्माण झाली होती़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन करणाºया महिला पदाधिकारी गायत्री जयस्वाल, मुनी मोरे, बानु शिरसाठ, ममता मोरे, सोमवंती मालचे, बेबी पवार, अंजना सोनवणे, सिमा कोळी, शोभा जाधव, रखमा पवार, चंदाबाई शिंदे़ सखुबाई पानपाटील, हिराबाई भरारी, हवसाबाई ठाकरे, ताराबाई पवार यांना ताब्यात घेतले होते़
बहिष्काराचा इशारा़
अक्कलपाडा धरणातुुन डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करून देखील न्याय मिळालेला नाही़ प्रशासनाने दखल न घेतल्यास परिसरातील गावे लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़