पोलीस अधीक्षकांतर्फे महासंचालकांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:20 AM2017-08-04T11:20:03+5:302017-08-04T11:21:28+5:30
गुड्ड्या खून प्रकरण : तपास वेगात सुरु
आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचे खून प्रकरण मंत्रालय पातळीपर्यंत जावून पोहचले आहे़ आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली़ मागणीनुसार तशा आशयाचे पत्र मंत्रालयस्तरावरुन पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आले़ त्या अनुषंगाने हा तपास स्थानिक पोलिसांकडे राहू द्यावा, आत्मविश्वासाने तपास सुरु आहे़ असा विश्वास व्यक्त करत आपण आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा अशा आशयाचा पत्रव्यवहार पोलीस महासंचालक यांच्याकडे करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिली़
गुड्ड्याचा खून १८ जुलै रोजी झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास कामाला सुरूवात केली. संशयितांकडे मोबाईल नसल्याने तपासात अडचणी येत होत्या़ मात्र पोलिसांनी आत्मविश्वास ढासळू दिला नाही़ प्रकरण गंभीर असल्याने घटनेनंतर दोन दिवस शहरात त्याचे पडसाद उमटले होते