बॉस्केटबॉल स्पर्धेत पोलिस संघाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:46 PM2019-01-01T21:46:05+5:302019-01-01T21:46:58+5:30

शिरपूर : कर्मवीर रणधीर स्कूलमध्ये घेण्यात आली स्पर्धा

Police team wins basketball tournament | बॉस्केटबॉल स्पर्धेत पोलिस संघाची बाजी

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरात कर्मवीर व्यंकटराव रणधीर सी.बी.एस.ई. स्कूलच्या मैदानावर खुल्या बॉस्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले़ अंतीम सामना एकतर्फी होवून धुळे येथील पोलिस बॉईज संघाने विजेतेपद पटकाविले़
रणधीर सीबीएसई स्कूलच्या मैदानावर खुल्या बॉस्केटबॉल स्पर्धा घेण्यात आल्यात़ स्पर्धेचे उद्घाटन तहसिलदार चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, निशांत रंधे, के़एनक़ार्तिक, सीमाताई रंधे, रोहित रंधे, हर्षाली रंधे, आनंदसिंग राउळ, शशांक रंधे, डॉ.जितेंद्र चित्ते, शामकांत पाटील, संजय गुजर, ए. ए.पाटील, किशोर बच्छाव, भैय्या माळी, सीताराम माळी, प्राचार्या प्रसन्ना मोहन, अमोल सावळे, सागर वाघ, निलेश सोनार आदी उपस्थित होते. स्पर्धेत १२ संघ सहभागी झालेत़ अंतीम सामना धुळे येथील पोलिस बॉईज विरूध्द चाळीसगांव येथील राष्ट्रीय महाविद्यालय क्लब यांच्यात झाला़ धुळे संघाने ४७ गुण तर विरोधात चाळीसगांव संघाने ३३ गुण मिळविल्याने धुळे संघ विजयी झाला़ धुळे संघाकडून रियाज शेख, इम्रान खाटीक, तिरूपती खांडेकर यांनी उत्कृष्ट खेळ सादर करून संघाला विजय मिळवून दिला़ विरोधी संघाकडून धनंजय आढावे, सागर राजपूत, प्रितेश राजपूत यांनी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले़ विजेता धुळे संघाला रोख २ हजार रूपयांसह चषक, उपविजेता चाळीसगांव संघाला १५०० रूपये व चषक, तृतीय क्रमांक खेतीया संघाला १ हजार रूपये व चषक देवून सन्मानीत केले़ सर्वोकृष्ट खेळाडूंचा बहुमान धुळे संघातील समीर खाटीक तर बेस्ट शुटरचा धनंजय आढावे यांना दिला़ विजेत्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते झाला़ पंच म्हणून वसीम शेख, योगेश पांडे व धनराज चव्हाण यांनी केले़

Web Title: Police team wins basketball tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे