गस्तीवरील पोलिसांची सतर्कता अखेर ‘लुटी’चा प्रयत्न फसला़़़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 09:47 PM2019-09-21T21:47:35+5:302019-09-21T21:48:02+5:30

सुरत बायपासवरील घटना : एकास अटक, वाहनांसह मुद्देमाल जप्त, पुन्हा २ संशयित ताब्यात

Police vigilance alerts 'robbery' attempt at last! | गस्तीवरील पोलिसांची सतर्कता अखेर ‘लुटी’चा प्रयत्न फसला़़़!

गस्तीवरील पोलिसांची सतर्कता अखेर ‘लुटी’चा प्रयत्न फसला़़़!

Next

धुळे : सुरत बायपासवर अंधाराचा फायदा घेत लुटीच्या प्रयत्नात असलेल्या लुटारुंचा मनसुबा शहर पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने उधळून लावला़ पोलिसांनी दरोडेखोरांपैकी एकाला पाठलाग करुन पकडले़ वाहनांसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे़ दरम्यान, दोन संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़ 
शहर पोलीस ठाण्याचे गस्तीपथक शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे गस्त घालत होते़ सुरत बायपासवरील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसमोर असलेल्या नवीन पुलाजवळ एमएच ३९ एडी २८८६ ही पांढºया रंगाची पिकअप व्हॅन संशयास्पद रितीने उभी असलेली दिसली़ पोलिसांनी त्या वाहनाजवळ आपले वाहन नेले असता पोलिसांना पाहून तेथून चौघांनी पळ काढला़ पोलिसांनी देखील नाट्यमयरित्या त्यांचा पाठलाग केला़ मात्र, अंधाराचा फायदा घेत त्यातील तिघे पळून गेले़ तर एक जण पोलिसांच्या हाती लागला़ 
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे मनोज योगराज पाटील (२८, रा़ क्रांतीचौक, मोहाडी उपनगर, धुळे) असे नाव आहे़ तर त्याचे पळून गेलेल्या साथीदार संशयितांमध्ये सागर धुमाळ, बन्सी गोसावी (दोघी रा़  मोहाडी) (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अन्य एक अनोळखी इसम असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ 
घटनास्थळावरुन पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीची महिंद्रा पिकअप व्हॅनसह २५ हजार रुपये किंमतीची एमएच १८ यू ८०५३ क्रमांकाची मोटारसायकल, साडेनऊ हजार रुपये किंमतीचे गॅस कटर, ५०० रुपये किंमतीचे हॉकी स्टीक व दोन लोखंडी पाईप, १० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण मुद्देमाल शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने जप्त केला आहे़ 
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी भेट दिली़ हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली़ त्यानुसार, संशयित मनोज पाटीलसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ 
ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे तसेच भिका पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्रकाश पाटील, संदिप पाटील, मुक्तार मन्सुरी, राहुल पाटील, नरेंद्र परदेशी होमगार्ड सागर मोरे यांनी केली आहे़ संशयित मनोज पाटील याला न्यायालयात हजर केले असता २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ डी़ पी़ पाटील तपास करीत आहे़ 

Web Title: Police vigilance alerts 'robbery' attempt at last!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.