पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, धुळ्यातील श्रीहरी कॉलनीतील घटना, कारण अस्पष्ट
By देवेंद्र पाठक | Published: February 25, 2023 04:24 PM2023-02-25T16:24:31+5:302023-02-25T16:25:10+5:30
घरात कोणीही नसल्याची संधी साधून पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
धुळे :
घरात कोणीही नसल्याची संधी साधून पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना साक्री रोडवरील श्रीहरी काॅलनीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. महावीर सखाराम भदाणे (वय ५४) असे मयत पोलिसाचे नाव आहे. धुळ्यातील साक्री राेडवर श्रीहरी कॉलनीत महावीर सखाराम भदाणे (वय ५४) आपल्या परिवारासोबत राहतात. सध्या ते पोलिस मुख्यालयात नेमणुकीला आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते घरात एकटेच हाेते. ही संधी साधून घरातील खालच्या बैठक हॉलमध्ये घराच्या छताला असलेल्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. घरात सदस्य आल्यानंतर घटना लक्षात येताच खासगी वाहनाने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉ. सूरज पावरा यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात त्यांचा मुलगा सागर महावीर भदाणे (वय ३४) यांनी फिर्याद दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पाटील करीत आहेत.
दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.