वंचित बालकांना घरोघरी पोलिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:04 PM2020-01-21T23:04:33+5:302020-01-21T23:04:59+5:30
महापालिका : आरोग्य विभागाकडून लस
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या आरोग्य विभागाने पल्स पोलिओ मोहीम राबवली. या मोहिमेत ० ते ५ वर्ष वयोगटातील ६१ हजार ५८६ बालकांपैकी ५३ हजार ११२ लस देण्यात आली. त्यापैकी उर्वेरित बालकांना मंगळवार पासून लस देण्यात येत आहे़
शासनाच्या आदेशानुसार शहरात रविवारी पल्स पोलिओ मोहीम रावविण्यात आली होती़ त्यासाठी महापालिकेच्या १३ रुग्णालयांसह १६५ ठिकाणी लसीकरण केंद्राची व्यवस्थाक करण्यात आली होती़ त्याशिवाय बसस्थानक, टॅक्सी स्टॉप, बगिचे, खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी पथकांची नियुक्ती तसेच नऊ ठिकाणी विशेष सेंटर होते. पाच मोबाइल पथक नियुक्त होते. यामोहिमेतून महापालिका आरोग्य केंद्रातर्फे एका दिवसात ६१ हजार ५८६ बालकांपैकी ५३ हजार ११२ लस देण्यात आले होते़ लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना मंगळवार ते शनिवार या कालावधी घरोघरी जावून लसीकरण देण्यात येत आहे़