राजकीय पक्षांमध्ये सक्षम महिला नेतृत्त्व नाही - सुप्रिया सुळे
By admin | Published: April 20, 2017 01:03 PM2017-04-20T13:03:11+5:302017-04-20T13:03:11+5:30
राजकारणात सक्षम महिला नेत्तृत्व मिळाले, तर देशाचा विकास आणखी झपाटय़ाने होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.
Next
धुळे, दि.20 - सद्य:परिस्थितीत महिलांनी सर्व क्षेत्रात भरारी घेतली आहे. मात्र राजकीय पक्षांमध्ये आजही सक्षम महिला नेत्तृत्त्व मिळत नाही. राजकारणात सक्षम महिला नेत्तृत्व मिळाले, तर देशाचा विकास आणखी झपाटय़ाने होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.
धुळे शहरातील ङोड. बी. पाटील महाविद्यालयात गुरुवारी सकाळी संवाद कार्यक्रम झाला. त्यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, अरूण साळुंखे उपस्थित होते. खासदार सुळे यांनी सांगितले, की कॉलेज निवडणुका पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींना राजकारणाचेही धडे घेता येणार आहे. येथूनच देशाच्या विकासाचे ध्येय असलेले सक्षम नेतृत्व तयार होऊ शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशन द्यायलाच हवे. तसेच शिक्षणात आर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
सर्व पक्षांची सकारात्मक भूमिका
कूलभूषण जाधव यांना खोटय़ा आरोपाखाली पाकि स्तानने अटक केली असून आता पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सर्व पक्षांची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी येथे सांगितले.
व्यापारी व डॉक्टरांशी केली चर्चा
धुळे शहरातील जेलरोड येथील आएमए सभागृहात दुपारी खासदार सुळे या डॉक्टर, व्यापारी यांच्याशी चर्चा करत आहे. या कार्यक्रमानंतर त्या रेल्वेस्टेशनरोडवरील राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत.