धुळे येथे रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:47 AM2019-03-29T11:47:23+5:302019-03-29T11:49:06+5:30

८ बाय ६ आकाराची रांगोळी काढण्यासाठी लागले १२ तास

Polling Public awareness through the Rangoli Dhule at Dhule | धुळे येथे रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती

धुळे येथे रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात काढली भव्य रांगोळीरांगोळी काढण्यासाठी लागले १२ तासदर तीन दिवसांनी वेगवेगळ्या रांगोळ्या काढणार

आॅनलाइन लोकमत
धुळे : मतदानाविषयी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रचार रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात येत असून, आता जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळीच्या माध्यमातूनही मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मतदानाबद्दल जनजागृतीसाठी आतापर्यंत विविध शाळांतर्फे प्रचार रॅली काढण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजवावा याविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला प्रतिसादही चांगला मिळालेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या संख्येने येत असतात. अनेक जण अशिक्षित असले तरी चित्राच्या माध्यमातून योग्य संदेश दिला जात असल्याने, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली आता जिल्हाधिकारी कार्यालयात रांगोळीच्या माध्यमातून मतदानाबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमास बुधवारपासून सुरूवात झालेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच ८ बाय ६ आकाराची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे. यात राष्टÑीय ध्वज चित्रीत केला असून, लोकसभा निवडणूक २०१९ व त्यावर मतदान करण्याचे बोट दाखविले आहे. तसेच रांगोळीतूनच हातात झेंडे घेतलेले नागरिकांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असा संदेश दिला आहे.
दरम्यान ही रांगोळी काढण्याचे काम इंदादेवी हायस्कुलचे शिक्षक सुनील मधुकर देसले, प्रभाकर हरी विभांडीक व एकवीरा विद्यालयाचे अनिल नारायण पाटील हे करीत आहेत. ही रांगोळी काढण्यासाठी या शिक्षकांना १० ते १२ तास लागले आहेत. दर तीन दिवसांनी वेगवेगळ्या रांगोळ्या काढून मतदानाविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे या शिक्षकांनी सांगितले.

 

Web Title: Polling Public awareness through the Rangoli Dhule at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे