भाव नसल्याने शेतातील डाळिंब काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:37 AM2017-07-20T00:37:20+5:302017-07-20T00:38:40+5:30
स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करण्याची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुबार तालुक्यातील वरुळ, बामडोर, शिंदे, समशेरपूर आदी शेतशिवारात डाळिंबाचे भाव घसरल्याने शेतकºयांकडून ही झाडे काढण्यात येत आहेत़ उत्पन्नापेक्षा त्यांना खर्चच अधिक येत असल्याचे संबंधित सुमारे २५ शेतकºयांकडून ही कार्यवाही करण्यात आली आाहे़ डाळिंबाला भावही नगन्य असल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़
जाणकार शेतºयांच्या म्हणण्यानुसार डाळींबची शेती करण्यासाठी एकरी ९० हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे सांगण्यात आले़ तसेच याचे उत्पन्न लागवडीपासून सुमारे दोन वर्षांनंतर मिळत असते़ त्याच प्रमाणे ज्या वेळी डाळिंबाच्या झाडाला बहर येतो तेव्हाही बºयापैकी पैसा खर्च करावा लागत असतो़ त्या मानाने स्थानिक तसेच इतर लगतच्या बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकºयांना उत्पादनाचा खर्च काढणेही शक्य होत नसल्याची व्यथा शेतकºयांकडून मांडण्यात आली आहे़ सध्या सुरत, नाशिक, मालेगाव आदी बाजारपेठेच्या ठिकाणी १५० ते ६०० रुपये प्रति कॅरेट डाळींबाला भाव उपलब्ध आहेत़ एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब असल्याचे सांगण्यात आले़
संबंधित परिसरात बहुसंख्य शेतकºयांनी डाळिंबाची झाडे लावली होती़ काही कालावधीने का होईना परंतु डाळिंबाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकºयांना होती़ परंतु बाजारपेठेत डाळिंबाला भाव नसल्याने शतकºयांची आर्थिक हानी होत होती़ त्यातच स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकºयांना आपल्या मालाची इतर ठिकाणी निर्यात करावी लागत असल्याने त्यातही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी डाळींबाची झाडे काढून त्या ठिकाणी इतर पीक घेण्याला आता पसंती दिली असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरातील सुमारे २५ शेतकºयांनी टॅक्टरच्या साहाय्याने आपल्या शेतातील डाळिंबाची झाडे काढणीला सुरुवात केली आहे़ दरम्यान, इतका खर्च होऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने शेतकºयांची यात मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे़ तसेच यामुळे अनेक शेतकºयांचे आर्थिक गणितदेखील कोलमडले आहे़
डाळिंबावर हवामानाचाही परिणाम - कृषी साहाय्यक
डाळिंबासाठी येथील हवामान योग्य नसल्याचे कृषी साहाय्यक सुधीर वाघमारे यांनी सांगितले डाळिंबाच्या लागवडीसाठी निचरा होणारी मुरमाळ जमिन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ काळ्या जमिनीत पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याने याचा परिणाम पिकावर होत असतो़ त्याच बरोबर माती-पाणी परिक्षणाबाबतही शेतकरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याने याचा विपरित परिणाम डाळिंबावर झाला आहे़ शिवाय काही भागात डाळिंबावर तेल्या रोग येत असतो़त्यामुळे झाडे वाळतात़ या सर्वांमुळे डाळिंबाचा दर्जा खालावतो व भाव मिळण्यास अडचणी येतात़