धुळे येथील एकवीरा देवी मंदिरात १०१ कुमारिकेंचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 05:12 PM2018-10-13T17:12:37+5:302018-10-13T17:14:01+5:30
ललीत पंचमीनिमित्त मारवाडी महिला मंडळातर्फे पूजनाचा कार्यक्रम
धुळे- खान्देशची कुलस्वामिनी माता एकवीरादेवी मंदिरात शनिवारी चौथ्या माळेला सकाळी १० वाजता १०१ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. मारवाडी महिला युवा मंच व अग्रवाल मिटटाऊन मंच याच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुमारिका पुजनाचे ११ वे वर्ष होते.
शनिवारी चौथी माळ व ललीत पंचमी होती. या दिवशी आदिशक्तीला बाल्य रूपात पाहिले जाते. त्यामुळे २ ते ९ वर्षाआतील कुमारिकांचे पूजन करण्याची परंपरा आहे. यावेळी मारवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन पसारी, अरूणा भराडिया, अनुजा घोटी, सविता बंग, रचना मुंदडा, करिश्मा कुचरिया, छाया धुप्पड, तिलोत्तमा धुप्पड, उमा अग्रवाल, वर्षा अग्रवाल, विणा अग्रवाल, आशा राठी, सविता मुंदडा आदी उपस्थित होत्या. कुमारिका पूजन झाल्यानंतर मंदिरात उपस्थित १०१ कुमारिकांना साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला.