पूनम शेंडे यांना ‘मिसेस इंडिया’ किताब

By admin | Published: February 15, 2017 12:03 AM2017-02-15T00:03:05+5:302017-02-15T00:03:05+5:30

धुळ्यासाठी गौरव : 5 हजार महिलांमधून पुरस्कार

Poonam Shenday is the 'Miss India' book | पूनम शेंडे यांना ‘मिसेस इंडिया’ किताब

पूनम शेंडे यांना ‘मिसेस इंडिया’ किताब

Next

धुळे : येथील पूनम शेंडे हिने ‘हॉट मोंड मिसेस इंडिया वर्ल्ड वाईड 2016-17’ हा मानाचा किताब नुकताच पटकविला आहे. शेंडे हिचे आई-वडील हे धुळ्यातीलच आहेत.
मुंबई, दुबई आणि दिल्ली येथे हा संपूर्ण कार्यक्रम तीन टप्प्यांमध्ये पार पडला. या स्पर्धेत भारतातील तसेच भारतीय वंशाच्या जगभरातील 5000 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. विवाहित महिलांमधून त्यांनी हा किताब पटकविला. दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांच्या हस्ते पूनमला हा किताब बहाल करण्यात आला. त्यासोबत पूनमला मिसेस कॉन्फिडेंट म्हणूनही गौरविण्यात आले. चित्रपट निर्मिती आणि इंटेरिअर डिझायनर पूनम शेंडे हिने पिंडदान, स्वामी पब्लिक लिमिटेड आणि जाऊ द्या ना बाळासाहेब या हिट चित्रपटाची निर्मिती केली आहे.
पूनम हिचे बालपण धुळ्यात गेले आहे, तसेच शिक्षणही धुळ्यातच झाले आहे. पूनमचे वडील भगवान गिते हे महापालिकेत उपायुक्त पदावर होते. तर आई कुसुम ही जिजामाता कन्या विद्यालय येथे शिक्षिका आहे. पुरस्काराबद्दल सर्व क्षेत्रातून पूनमचे कौतुक होत आहे.

Web Title: Poonam Shenday is the 'Miss India' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.