जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:05 PM2019-04-22T12:05:09+5:302019-04-22T12:05:37+5:30

तापमानात वाढ : ३७ अशांवरून रविवारी तापमानाचा पारा ‘चाळीशी’पार

The possibility of heat wave again in the district | जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता

dhule

googlenewsNext
ठळक मुद्देdhule


धुळे : सध्या तापमानाचा पारा पुन्हा चढू लागला आहे. उन्हाने कहर केला असून, रविवारी  शहराचा पारा ४० अंशावर पोहोचल्याने शहरात दुपारी वर्दळ अत्यल्प दिसून आली.
 शहर व परिसरात यंदा कमी पाऊस पडल्याने उन्हाचा कडाका अधिक जाणवणार हे जवळपास निश्चित होते आणि झालेही तसेच. गेल्या महिन्याभरापासून उन्हाने हळूहळू तीव्रता वाढविली आहे. गेल्या आठवड्याभरात सरासरी तापमान हे ३९ ते ४० अंशापर्यत पोहचले आहे़. आनखी दोन दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.  उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पांढºया कपड्यांना मोठी मागणी वाढली असून, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेला सन गॉगल्स देखील चढ्या भावाने विक्री होत असल्याचे दिसून आले. 

शितपेयांना मागणी़़
रखरखत्या उन्हात फिरताना घामाद्वारे अंगातील पाणी अन् क्षार निघून जाताना एक प्रकारचा अस्वस्थपणा, थकवा जाणवतो. हा अस्वस्थपणा, थकवा घालविण्याबरोबर उन्हाळी आजारांना फाटा देण्यासाठी रसदार फळांच्या ज्यूसचे सेवन करण्याकडे साºयांचाच कल वाढला असून, जारच्या पाण्यावर चालणारे ज्यूस सेंटर हाऊसफुल्ल दिसत आहेत. अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी मोसंबी, संत्र्याच्या ज्यूसला अधिक मागणी आहे. 

Web Title: The possibility of heat wave again in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे