किविप्र संस्थेतर्फे प्राजक्ता शिंदेचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:13 PM2018-12-08T18:13:08+5:302018-12-08T18:13:40+5:30
शिरपूर : राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्यपदक पटकाविल्याबद्दल्
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील सावित्रीबाई रंधे कन्या विद्यालयातील ११ वी विज्ञान वर्गातील प्राजक्ता युवराज शिंदे हिने नुकत्याच गुहाटी-आसाम येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्य पदक पटकाविले़ त्याबद्दल तिचा सत्कार संस्थेतर्फे चेअरमन डॉ़ तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आला़
येथील रंधे कन्या विद्यालयात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्य पदक प्राप्त करणारी प्राजक्ता युवराज शिंदे हिचा सत्कार करण्यात आला़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, ट्रस्टी लिलाताई रंधे, जि़प़सदस्या सीमा रंधे, ग्रंथालय विभागाच्या प्रदेधाध्यक्षा सारीका रंधे, प्राचार्या मंगला पावरा, प्राचार्य डॉ़एस़पटेल, शामकांत पाटील, आनंदसिंग राऊळ, प्रा़जी़व्ही़पाटील आदी उपस्थित होते़
२६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान गुहाटी-आसाम येथे ६४ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा १७ वर्षाआतील मुले-मुलींच्या गटातील झाल्यात़ त्यात प्राजक्ता शिंदे हिची निवड करण्यात आली होती़ त्यात उपांत्य सामना हरियाणाची तन्नु व प्राजक्ता शिंदे यांचा सामना झाला़ मात्र अटीतटीच्या सामन्यात शिंदे हरली़ शिंदे हिने बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण २०१६ पासून सुरुवात केली़ विश्वासराव रंधे क्रीडा संकुलात बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण घेत आहे़ ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते़ तसेच मुंबई येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती़