धुळे शहरातील १६ केंद्रावर होणार राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 05:17 PM2019-02-11T17:17:05+5:302019-02-11T17:18:46+5:30
६ हजार ३३६ परीक्षार्थी, ४३१ कर्मचाºयांना दिले सोमवारी प्रशिक्षण
आॅनलाइन लोकमत
धुळे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १७ फेब्रुवारी रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. शहरातील १६ केंद्रावर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ६ हजार ३३६ विद्यार्थी प्रविष्ठ आहे. परीक्षेसाठी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी,कर्मचाºयांना आज प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. त्यात आयोगाच्या नियमाचे काटेकोर पालन करून परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना संबंधितांना देण्यात आले. तर शनिवारी संबंधितांकडून केंद्रावर नंबर टाकण्यात येतील.
राज्यसेवा पूर्व परीक्षा सुरळी व्हावी यासाठी प्रशासनाखडून केंद्रावर उपकेंद्रप्रमुख, सहायक, पर्यवेक्षक, समवेक्षक, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ४३१ अधिकारी, कर्मचाºयांची परीक्षेसाठी नियुक्ती केली आहे. त्या अधिकारी, कर्मचाºयांना आज प्रशिक्षण देण्यात आले. त्यात परीक्षार्थींचे प्रवेशकार्ड, परीक्षेची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका कशी असेल. त्यावर नोंद कशा कराव्यात, तसेच परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका कशा पध्दतीने सिल कराव्यात यासह परीक्षेशी निगडीत असलेले नियम व इतर माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले. विविध नियमाचीही माहिती महसूल विभागाचे कर्मचारी अनिता येवले, विनोद चौधरी, सुधीर शिंदे, किरण बर्डे, अजय नाशिककर आदींकडून देण्यात आली. तर महसूल विभागाचे चिटणीस असलेले तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी परीक्षा सुरळीत व नियमानुसार पार पाडण्यासाठी संबंधित नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही, यांची खबरदारी घेवून आयोगाच्या सूचनाचे पालन करावे अशा सूचना दिल्यात.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, कृषी विकास अधिकारी पी.एम. सोनवणे आदी उपस्थित होते.