शेतशिवारांमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 09:45 PM2020-05-24T21:45:54+5:302020-05-24T21:46:14+5:30
शिरपूर तालुका : मशागतीच्या कामांसह ठिबक नळ्या अंथरण्याची लगबग, कापूस लागवडीला प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
तºहाडी : शिरपूर तालुक्यातील त-हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडे, लोंढरे, त-हाड कसबे, भामपुर, विखरण परिसरात शेतकऱ्यांनी खरीप पूर्व हंगामाच्या कापूस पीक लागवडीसाठी तयारी सुरु केली आहे.
तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला असताना शेतकऱ्यांसह शेतमजूरांची कुटूंबे कापूस लागवडीसाठी ठिबकच्या नळ्या अंथरण्यात व्यस्त आहेत़ शेतशिवारांमध्ये मशागतीच्या कामांसह पेरणीच्या तयारीची लगबग सुरु आहे़
बाजारात बीटी कपाशी बियाणे दाखल होऊन प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध झाली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त-हाडी परीसरात कुपनलिकांची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतात पाणी टंचाईची समस्या शेतकºयांना जाणवत आहे. यासाठी शेतकºयांनी पिकांना चारीद्वारे पाणी न देता कमी पाणी असल्याने ठिबक सिंचन करण्यास यंदा पसंती दिली आहे.
ठिबक पद्धतीने कापूस पिकाला पाणी दिल्याने कमी पाणी लागते व शेतात तण, अनावश्यक गवत जास्त उगवत नाही. निंदणी कोळपणी खर्च कमी येतो. तसेच ठिंबकने बागायती केल्यास जमीनीची धूप होत नाही. त्यासाठी ज्या शेतकºयांकडे पाण्याची बºयापैकी सोय आहे अशा शेतकºयांनी आपल्या शेतात कापूस पीक लागवडीसाठी व अन्य शेती पिके घेण्यासाठी नवीन ठिबक सिंचन लावण्याची धावपळ सुरु केली आहे. सध्या शेतात ठिबक सिंचन करणाºया प्रत्येक शेतकºयास शासनातर्फे ५० टव्के अनुदान दिले जाते. त्यामुळे सर्वच शेतकºयांचा कल याकडे वाढला आहे.
ठिंबक अंथरण्यासाठी मजुरी जास्त असल्याने मजूर न लावता कुटुंबातील सदस्यच कामे उरकताना दिसत आहेत़ चागल्या गुणवत्तेचे व नामांकित कंपनीच्या नळ्या खरेदी करुन शेतात एक बिगा शेतीसाठी ठीबकला ४० ते ५० हजारापर्यंत खर्च येतो. तरी देखील शेतकरी त्याला प्राधान्य देताना दिसतात़