विद्युत रोषणाईसह नवरात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:13 PM2019-09-26T22:13:40+5:302019-09-26T22:14:24+5:30

एकविरादेवी मंदिर : विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, दर्शनासाठी होणार गर्दी

Preparations for Navratri festival complete with electric light | विद्युत रोषणाईसह नवरात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास

विद्युत रोषणाईसह नवरात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास

Next

धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकविरादेवी मंदिरात २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत शारदिय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे़ या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत़ त्यात २९ सप्टेंबरला पहाटे   देवीची काकडा आरती, ८ वाजता घटस्थापना केली जाईल़ दुपारी १२ वाजता महापूजा व महाआरती  होईल़ दररोज दुपारी बारा वाजेच्या महाआरती नंतर साबुदाणा  खिचडीच्या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे़ नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज ५ महाआरतींचे आयोजन करण्यात आले आहे़ प्रत्येक महाआरतीचे यजमानपद भाविकांना दिले जाणार आहे़ ललिता पंचमी ३ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता १०१ कुमारी पूजन, रविवारी ६ आॅक्टोबरला नवचंडी यज्ञ व पुर्णाहुती, ७ आॅक्टोबरला महानवमी व सुवासिनी पूजन, ८ आॅक्टोबरला विजया दशमी सिमोलंघन, १३ आॅक्टोबरला कोजागिरी पोर्णीमा उत्सवा निमित्त   दुपारी बारावाजेच्या आरती नंतर मंदिर परिसरात भगवतीदेवी पालखी सोहळा, शंखतिर्थ, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर ५६ भोग नैवेद्य, देवीचा जागरण गोंधळ  आयोजित करण्यात आला आहे़ नवरात्रोत्सवाच्या काळात गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड  संपूर्ण महाराष्ट्रातून व दक्षीण भारतातून ही भावीक दर्शनासाठी येत असतात. अशा वेळी दर्शनासाठी भावीकांची  गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. अपंग बांधवाना दर्शनासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे़ सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण दहा दिवस मंदिर दर्शनासाठी चोविस तास खुले राहणार आहे़ विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले आहे़ 

Web Title: Preparations for Navratri festival complete with electric light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे