प्रभू येशुच्या जन्माच्या स्वागताची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:32 PM2019-12-21T22:32:24+5:302019-12-21T22:33:51+5:30

सांस्कृतिक कार्यक्रमांची राहणार मेजवानी । मंगळवारपासून दिवसभर राहणार आनंदाचे वातावरण

Preparing for the Birth of the Lord Jesus | प्रभू येशुच्या जन्माच्या स्वागताची तयारी

प्रभू येशुच्या जन्माच्या स्वागताची तयारी

googlenewsNext

धुळे : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असणाऱ्या नाताळ सणाची तयारी पूर्णत्वास आलेली आहे़ घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक प्रवचन, गाणी, कथा, नाटकासाठी चिमुकल्यांसह युवा-युवतींनी तयारीला वेग दिला आहे़
ख्रिसमसची तयारी पूर्ण झाली असून, मंगळवारी मध्यरात्रीनंतर नाताळ साजरा करण्यासाठी उत्साहाला उधाण येणार आहे. येशू जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी चर्चमध्येही रंगरंगोटी व रोषणार्ई करण्यात आली आहे़ तसेच प्रार्थना आणि धार्मिक, सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे़ मंगळवारी मध्यरात्रीनंतर घरोघरी पारंपरिक प्रार्थना आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे़
ख्रिश्चन बांधवासाठी दिवाळीप्रमाणे नाताळ सणाचे महत्व असते़ म्हणून प्रत्येकाकडे चकली, करंजी, लाडू आदी विविध गोड पदार्थ तयार केले जातात. नाताळाच्या एकमेकांच्या घरी गोडपदार्थ पाठवून, नाताळाच्या शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांना घरी फराळाला बोलावले जाते़
आकर्षक विद्युत रोषणाई
नाताळनिमित्त पेस्ट्रीज, केकने सजलेल्या बेकºया, ख्रिसमस ट्री, आकाश कंदिलाने सजलेला परिसर, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे जल्लोषपूर्ण वातावरणनिर्मिती ख्रिसमसनिमित्त होत आहे़ ‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल आॅल द वे’ असे म्हणत बुधवारी प्रभू येशूच्या जन्माचे स्वागत होणार आहे़
खरेदीसाठी बाजारात रेलचेल
नाताळनिमित्त शहरातील बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे़ यात विविध प्रकारचे शुभेच्छा पत्रे, सांताक्लॉजची टोपी, कपडे, चॉकलेट, कॅडबरी, सजावटीचे विविध साहित्य उपलब्ध झालेले आहे. त्याचबरोबर रंगीबेरंगी मेणबत्या, आणि डिझायनर जिंगल बेल्सला मागणी होऊ लागली आहे. मंगळवार २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता प्रार्थना करण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी दुपारीही विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येईल़ त्याचबरोबर रंगीबेरंगी मेणबत्या, आणि डिझायनर जिंगल बेल्सला मागणी आहे.
नाताळ सणाचे आकर्षण
मावळत्या वर्षास निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी ख्रिस्ती बांधवांसाठी नाताळ सण आनंदपर्वच असते. त्यामुळे एक महिना आधीपासून या सणाची तयारी केली जाते़ तर या दिवशी सांताक्लॉज, सांताक्लॉजची टोपी, कपडे, चॉकलेट, कॅडबरी, सजावटीचा देखावा आकर्षक असतो़ यासाठी शहरातील प्रार्थना स्थळांमध्ये दरवर्षी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन नाताळ साजरा करतात़़ काही शाळांना नाताळ निमित्त सुटी असल्याने मुलांच्या आनंदात अधिकच भर पडत असते़

Web Title: Preparing for the Birth of the Lord Jesus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे