गुड्ड्या खूनप्रकरणी पोलिसांच्या तपासावर दबाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:22 AM2017-08-15T00:22:43+5:302017-08-15T00:24:21+5:30

राष्ट्रवादीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन : मोबाइल संभाषण मागविण्याची मागणी

Pressure on the murder of the police! | गुड्ड्या खूनप्रकरणी पोलिसांच्या तपासावर दबाव!

गुड्ड्या खूनप्रकरणी पोलिसांच्या तपासावर दबाव!

Next
ठळक मुद्देभर पहाटे केला होता खुनकाही राजकीय मंडळींचे नाव घुसविण्याचा प्रयत्नपोलिसांनाही धमक्या दिल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गुड्ड्या खून प्रकरणाच्या आनुषंगाने आमदार अनिल गोटे तपास अधिकाºयांवर दबाव आणून पुराव्याशिवाय राजकीय व्यक्तींना गुन्ह्यात सामील करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे याबाबत वेळीच चौकशी करून आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़
गुड्ड्या खून प्रकरणानंतर आमदार अनिल गोटे हे शिवराळ भाषेत पत्रके काढून दबाव आणत आहेत़ पोलीस अधिकारी, तपासी अंमलदार यांना फोन करणे व इतर पोलीस अधिकाºयांच्या भेटी घेऊन त्यांच्यावर राजकीय दबाव आणत आहेत़
आता तुमची प्रकरणे बाहेर काढीन, अशा धमक्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना देऊन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व काही राजकीय मंडळींचे नाव चौकशीत घ्यावे, असा प्रयत्न आमदार गोटे करीत आहेत़
आमदार गोटे यांची पार्श्वभूमी पाहता त्यांनी राजवर्धन कदमबांडे यांचे नाव चौकशीत घुसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. आमदार गोटे व गुड्ड्या खून प्रकरणातील तपास करणारे पोलीस अधिकारी यांच्यातील मोबाइल संभाषणाचे ‘सीडीआर’ मागविण्यात यावे व योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली़
या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महापौर कल्पना महाले, किरण शिंदे, किरण पाटील, उमेर अन्सारी, कैलास चौधरी, मोहन नवले, अनिल मुंदडा, सुनील सोनार, संजय वाल्हे, ज्योती पावरा, सुभाष खताळ, इंदू वाघ, यमुना जाधव, शरद वराडे, माधुरी अजळकर, अरशद शेख, नलिनी वाडिले, आनंदा सूर्यवंशी, राजेंद्र माळी, चंद्रकला जाधव, आऱआऱ माळी, जगदीश गायकवाड, दिनेश शार्दुल, दीपक शेलार उपस्थित होते़
राष्ट्रवादीचे पदाधिकारी पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करीत आहेत़ गुड्ड्या खुनाच्या तपासासंदर्भात अधिक माहितीसाठी विशेष पोलीस महासंचालकांना पत्र दिले आहे़ गुड्ड्याने कारागृहात असताना वरिष्ठ अधिकाºयांना दिलेल्या पत्राचाही संदर्भ दिला आहे़ -अनिल गोटे, आमदार, धुळे शहर

Web Title: Pressure on the murder of the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.